Organ Donate Saam Tv
लाईफस्टाईल

Organ Donation: मरावे परी कीर्तिरूपे उरावे! अवघ्या 40व्या वर्षी जग सोडलं, जाता जाता तिघांना दिलं जीवनदान...

कोमल दामुद्रे

Pune News: अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४० वर्षीय व्यक्तीला २९ मे रोजी ब्रेन डेड घोषित केल्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याचे अवयव दान करण्यात आले.

या व्यक्तीचा ऑफिसला (Office) जात असताना अपघात झाला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला आपला प्राण गमवावा लागला. या रुग्णाच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि ५ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. ही घटना कुटुंबासाठी अनपेक्षित आघात होता पण मानवतेसाठी आणि अवयव निकामी झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी कुटुंबाने (Family) अवयवदानाचा हा धाडसी निर्णय घेतला. असे डॉ. वृषाली पाटील, प्रोग्रॅम डिरेक्टर, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी यांनी सांगितले.

अहमदनगर येथील ३० वर्षांच्या तरुणाचे या शस्त्रक्रियेने प्राण वाचवण्यात आले. जो टाईप १ मधुमेहाने (Diabetes) ग्रस्त होता. यावर किडनी आणि स्वादुपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. मागील 7 वर्षांपासून या आजारांने तो ग्रस्त होता.

५० वर्षांचे व्यक्ती यकृत आणि किडनीच्या जुनाट आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया एकाच दिवशी पूर्ण करण्यात आली. ज्यामुळे संस्थेसाठी आणखी एक महत्त्वाची कामगिरी नोंदवली गेली. पुणे ZTCC वाटप निकषांनुसार डीपीयु प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दोन रुग्णांना किडनी आणि स्वादुपिंड व मूत्रपिंड आणि यकृताचे दान करण्यात आले. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात एका रुग्णाला हृदयाचे दान करण्यात आले.

या मृत व्यक्तीच्या संमतीनंतर त्यांनी मुलाचे हृदय, २ मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड आणि २ कॉर्निया दान करून तीन लोकांचे प्राण वाचले आहे. डॉ. मनीषा करमरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे, यांनी आव्हानात्मक प्रकरणे हाती घेतल्याबद्दल आणि क्लिनिकल उत्कृष्टता प्राप्त केल्याबद्दल संपूर्ण टीमचे कौतुक केले. एकाच वेळी दुहेरी प्रत्यारोपण करण्याची ही गेल्या ६ महिन्यांतील दुसरी वेळ आहे. असे त्यांनी नमूद केले की, "डीपीयूमध्ये अवयव दानाबद्दल जनजागृती आणि शिक्षित करण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो."

जशी जागरूकता वाढते तसतशी अनेक कुटुंब आपल्या प्रिय व्यक्तीचे अवयव दान करण्यासाठी पुढे येत आहेत. डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे पुण्यातील एकमेव खाजगी रुग्णालय आहे ज्याला विविध बहु-अवयव प्रत्यारोपणाचे श्रेय दिले जाते, आम्ही अवयव दान आणि प्रत्यारोपण सुलभ करण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करणे सुरू ठेवले आहे”, डॉ. यशराज पाटील, विश्वस्त आणि खजिनदार, डीवाय पाटील विद्यापीठ सोसायटी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखीन एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT