World Organ Donation Day 2022 : अवयव दान का केले जाते? ते कोण करु शकते ? या दिवसाची सुरुवात कधी झाली? जाणून घ्या

अवयव दान कोण करु शकते? त्यासाठी व्यक्तीचे वय किती असायला हवे ?
World Organ Donation Day
World Organ Donation DaySaam Tv

World Organ Donation Day : अवयव निकामी होणे हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. एखाद्या व्यक्तीने स्वादुपिंड, फुफ्फुसे, हृदय, मूत्रपिंड, यकृत, आतडे, उती, अस्थिमज्जा आणि स्टेम पेशी दान करण्याचे वचन दिल्यास ती दीर्घकालीन आजारांपासून आठ जीव वाचवू शकते.

लोकांना त्यांचे अवयव (Organs) दान करण्याची प्रतिज्ञा करण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जागतिक (World) अवयव दान दिन साजरा केला जातो. जागतिक अवयव दान दिन साजरा करण्यामागचा उद्देश अवयव दान करण्यासंबंधीच्या गैरसमज दूर करणे हा आहे.

अवयव दान कोणीही करु शकतो परंतु, त्याला कर्करोग, एचआयव्ही किंवा हृदय व फुफ्फुसाच्या संसर्गासारख्या जुनाट आजारांनी ग्रासले असलेल्यांनी अवयव दान न करण्याचा सल्ला दिला जातो. एकदा १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणीही अवयव दान करु शकतो. दात्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्यास, त्यांना अवयव दाता म्हणून नोंदणी करण्यासाठी पालक किंवा प्रौढ पालकांची संमती असावी.

World Organ Donation Day
Skin Care Tips : त्वचेसाठी रेटिनॉलचा वापर करताय? होऊ शकते हानी, अशावेळी त्वचेची काळजी कशी घ्याल?

पहिल्यांदा अवयव दान कोणी केले ?

अवयवदानाच्या क्षेत्रात वैद्यकीय शास्त्राने गेल्या काही वर्षांत सुधारणा केली आहे. अवयवदान केल्याने कोणत्याही अवयव निकामी झालेल्या व्यक्तींना नवीन जीवन मिळते. अवयवदान दोन प्रकारचे असते: जिवंत दान आणि शव दान. जिवंत दानामध्ये व्यक्ती जिवंत असल्यास अवयव दान करु शकते. तसेच शव दानमध्ये दात्याच्या मृत्यूनंतर अवयव दान केले जाते.

रोनाल्ड ली हेरिक हे पहिले अवयव दाता होते आणि त्यांनी आपल्या जुळ्या भावाला किडनी दान केली होती. १९९० मध्ये, डॉक्टर जोसेफ मरे यांना अवयव प्रत्यारोपणातील त्यांच्या कामगिरीबद्दल शरीरविज्ञान आणि औषधासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. विशेष म्हणजे, सर्वात जुनी ज्ञात दाता स्कॉटलंडमधील १०७ वर्षीय महिला दाता होती जिने २०१६ मध्ये तिच्या निधनानंतर कॉर्निया दान केला होता. (World Organ Donation day)

अवयव दान केल्यामुळे काय होते?

अवयवदानामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. हे अवयव निकामी झालेल्यांना जगण्याची नवी प्रेरणा देते. अवयवदानाच्या महत्त्वाविषयी लोकांना जागरुक करण्यासाठी आणि त्यासाठी स्वयंसेवा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो. हा दिवस एखाद्याचे जीवन वाचवण्यासाठी अवयवदानाची महत्त्वाची भूमिका लोकांना समजण्यास मदत करतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com