Mukesh Ambani New Car Saam TV
लाईफस्टाईल

Mukesh Ambani New Car: मुकेश अंबानींची नवीन रोल्स रॉयस पाहिली का? किंमत जाणून व्हाल थक्क

Mukesh Ambani : मुकेश अंबानींची नवीन रोल्स रॉयस पाहिली का? किंमत जाणून व्हाल थक्क

Satish Kengar

Mukesh Ambani New Car: मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची घरापासून ते कारपर्यंत राहणीमान अतिशय आलिशान आहे. अंबानी कुटुंबाकडे अनेक लक्झरी आणि स्पोर्ट्स कार आहेत आणि ते अनेकदा त्यात दिसतात.

अंबानी कुटुंबीयांकडे अनेक कार असल्या तरी त्यांना रोल्स रॉयस कार ही खुप आवडते. म्हणूनच ते त्याचा वापर ही अधिक करतात. यातच आता अंबानी कुटुंबाने आणखी एक रोल्स रॉयस खरेदी केली आहे. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

अंबानींची ही कार मुंबईच्या स्त्यावर पहिल्यांदाच दिसली आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. जो CS12 Vlogs नावाच्या चॅनलने अपलोड केला आहे. व्हिडीओमध्ये नवीन रोल्स रॉयस घोस्ट ट्रॅफिक सिग्नल ओलांडताना दिसत आहे. (Latest Marathi News)

ही Rolls-Royce Ghost नवीन जनरेशन मॉडेल आहे. जे 2020 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. याची किंमती 6.95 कोटी रुपयांपासून सुरू होतेआणि 7.95 कोटी रुपयांपर्यंत जाते. Rolls Royce Ghost भारतात दोन प्रकारात उपलब्ध आहे.

Rolls-Royce Ghost आपल्या लक्झरीसाठी ओळखली जाते आणि दुसऱ्या जनरेशनसह कंपनीने याला पूर्णपणे नवीन स्तरावर नेले आहे. दुसऱ्या जनरेशांच्या घोस्टला पूर्णपणे नवीन डिझाइन, नवीन प्लॅटफॉर्म आणि चेसिस मिळतात.

Rolls-Royce Ghost कार 6.75-लिटर, V12 इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 563 hp पॉवर आणि 820 Nm टॉर्क जनरेट करते. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. कार फक्त 4.6 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाला तुळस का अर्पण केली जात नाही?

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईदौऱ्यासाठी अंतरवाली सराटीत जोरदार तयारी

Shocking: गुटख्यासाठी नवऱ्यानं पैसे दिले नाहीत, ३ मुलांना विष पाजत महिलेने स्वतःलाही संपवलं

Shocking : नाशिक हादरलं! बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास प्रवृत्त, अल्पवयीन मुलीनं आयुष्याचा दोर कापला

Ganpati Darshan : मित्रांनो! सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाला जाताना 'ही' घ्या खबरदारी

SCROLL FOR NEXT