Mud Therapy  Saam TV
लाईफस्टाईल

Mud Therapy : चेहऱ्याला माती लावा आणि भन्नाट फायदे मिळवा; वाचा कशी आहे मड थेरेपी

Mud Therapy For Health : ज्या व्यक्तींना त्वचेशी संबंधित पीपल्स, ड्राय स्किन तसेच अन्य त्वचेच्या विविध समस्या असतील तर त्यांच्यासाठी प्राकृतिक मड थेरेपी फार लाभदायी आहे.

Ruchika Jadhav

नैसर्गिक गोष्टींपासून आपल्याला विविध आजारांवर मात करता येते. अशात आपण सुंदर आणि छान दिसावं, आपली त्वचा कोमल असावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. त्यामुळे सर्वजण काहीनाकाही कॉस्मेटिक्स वापरतात. मात्र असे करण्यापेक्षा चेहऱ्यावर माती लावण्याचे देखील भन्नाट फायदे आहेत. हे तुम्हाला माहितीये का?

माती म्हणजे नैसर्गिक घटक. मातीमध्ये विविध जीवनसत्व असतात. त्यासह यात झिंक, ब्रोमिन, सल्फर आणि मॅग्नेशियम देखील असते. आपल्या त्वचेसाठी हे फार फायदेशीर आहे. ज्या व्यक्तींना त्वचेशी संबंधित पिंपल्स, ड्राय स्किन तसेच अन्य त्वचेच्या विविध समस्या असतील तर त्यांच्यासाठी प्राकृतिक मड थेरेपी फार लाभदायी आहे.

काय आहे मड थेरेपी

मड थेरेपीमध्ये 3 ते 4 फुल खोल खड्डा करून त्यातील माती काढली जाते. या मातीत थंड गुलाब जल किंवा कोमट पाणी मिक्स करून सॉफ्ट पेस्ट बनवली जाते. त्यानंतर ही पेस्ट एका सूती पांढऱ्या रंगाच्या पट्टीवर ठेवली जाते. मातीच्या विविध पट्ट्या करून चेहऱ्यावर लावली जाते. शरीरावर अन्य कुठे स्किन एलर्जी असेल तर गरम मातीची पट्टी तेथे ठेवली जाते. याने स्किन प्रॉब्लेम बरे होतात.

मड थेरीपीचे विविध फायदे

मड थेरेपीमधून विवध फायदे मिळतात. याने पोटातील गरमी कमी होते. तसेच अॅसिडीटी सारख्या समस्या कमी होतात.

उन्हाळ्यात हिट स्ट्रोक झाल्यास कपाळावर आणि पोटावर मातीची पट्टी ठेवावी. त्याने लगेचच आराम पडतो.

मायग्रेनचा त्रास असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर आणि डोळ्यांवर मातीची पट्टी ठेवावावी. असे केल्याने मायग्रेनचा त्रास लवकर कमी होतो.

नकासंबंधी काही अडचणी असतील तर त्या व्यक्तींनी देखील नकवर मातीची पट्टी लावून ठेवावी.

डिहायड्रेशन आणि ड्राय स्किनच्या समस्या मातीची पट्टी वापरल्याने कमी होतात.

टीप : मड थेरेपीमुळे होणाऱ्या फायद्यांचा साम टीव्ही दावा करत नाही. तुम्ही आरोग्य तज्जांचा सल्ला घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुख्यात गुंड निलेश घायवळच्या गाडीवर पोलिसांचा फास; उसाच्या शेतातून कार जप्त|VIDEO

Maharashtra Live News Update : बंजारा समाज आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरणार

Lung Cancer Symptoms: फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणं हाता-पायांवर सर्वात आधी दिसतात? तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण माहिती

Virar Tourism : विरारमध्ये लपलंय एक सुंदर लोकेशन, जे पाहताच तुम्ही कुल्लू मनाली विसराल

Baklava Recipe: बिग बॉस फेम तान्या मित्तलला आवडणार बकलावा कसा करायचा घरी, जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT