Feet Massage For Mental and Physical Health : मेंटल आणि फिजिकल हेल्थसाठी पायांच्या तळव्यांची मालिश करणे अतिशय फायदेशीर

दैनंदिन कामकाज करून बऱ्याचदा थकवा, ताणतणाव, चिंता यांसारख्या अनेक समस्या होऊ लागतात.
Feet Massage For Mental and Physical Health
Feet Massage For Mental and Physical Health Saam Tv

Feet Massage For Mental and Physical Health : धावपळीच्या या जीवनामध्ये माणसाचे पूर्ण जीवन उदास झाले आहे. त्याचबरोबर दैनंदिन कामकाज करून बऱ्याचदा थकवा, ताणतणाव, चिंता यांसारख्या अनेक समस्या होऊ लागतात. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना पायांचा त्रास उद्भवला आहे. बरेच लोक या समस्येपासून पीडित असतात.

थकवा येणे आणि पायांमध्ये दुखणे या समस्यांवर उपाय म्हणून लोक पायांची मालिश करून घेतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पायांची मालिश केल्याने कोणते फायदे होतात.

पायांना मालिश केल्याने पायाचे दुखणे थांबते. त्याचबरोबर तुम्ही थकलेला असाल तर पायांची मालिश केल्याने तुम्हाला चांगले फील होते. तुमचा सगळा थकवा , शिन नाहीसा होतो. मालिश केल्याने पायांचे दुखणं तर थांबतच त्याचबरोबर मालिश केल्याने तुमचे स्वास्थ्य देखील सुधारते.

पायांची मालिश फक्त थकवा नाही तर स्ट्रेस दूर करून आपल्याला रिलीफ मिळण्यासाठी मदत करते. जर तुम्ही रात्रीचे (Night) झोपताना पायांची मालिश करून झोपता तर ते तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

दिवसभरच्या थकव्यामुळे सगळेजण त्रासलेले असतात. त्याच्यातच कोणी आपल्या पायांची मालिश करून देत असेल. तर आपल्याला फार बरे वाटते त्याचबरोर थकवा देखील निघून जातो.

पायांची मालिश करण्याचे फायदे -

1. सतत पायांची मालिश केल्याने तुमचे वजन कमी (Weight Loss) होण्यास मदत होते. त्याचबरोबर मालिश केल्याने तुमच्या शरीरामध्ये मेटाबोलिजम व्यवस्थित राहते. आपले वजन कमी करण्यास मदत करते.

2. पायांना मालिश केल्याने लठ्ठपणा कमी होतो. त्याचबरोबर शरीरामधील वेगवेगळ्या ठिकाणी असलेले दुखणे निघून जाते. त्याचबरोबर घामामार्फत शरीरामध्ये उपलब्ध असणारे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

3. बऱ्याचदा थकवा आणि ताण तणावामुळे रात्रीची झोप येत नाही. अशातच तुम्ही पायांची मालिश केली. तर तुम्हाला चांगली झोप येईल त्याचबरोबर तुमचा थकवा निघून जाईल आणि ताण तणाव देखील कमी होईल. त्याचबरोबर तुमचे मन देखील शांत राहील.

4. पायांची मालिश केल्याने मानसिक लाभ तर भेटतोचं पण त्याचबरोबर शारीरिक लाभ सुद्धा मिळतो. दररोज पायांच्या तळव्यांना मालिश केल्याने गुडघ्यांच्या समस्यांपासून थोडा आराम मिळतो. मालिश केल्याने ब्लड सर्कुलेशन सुरळीत रित्या काम करते आणि तुमच्या नसांना आराम देते.

5. पायांच्या तळव्यांची मालिश करणे हे स्त्रियांसाठी देखील आरामदायक असते. त्याचबरोबर मासिक पाळीच्या वेळी महिलांच्या पायांच्या तळव्यांना मालिश केल्याने त्यांना मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो.

6. बरेच लोक एक्यूप्रेशर थेरेपी सुद्धा घेतात. एज्युकेशन थेरेपीमध्ये असे मानले जाते की, तळ्यांमध्ये असलेले वेगवेगळे बिंदू शरीराच्या वेगवेगळ्या अंगांना जोडलेले असतात. म्हणूनच मालिश करताना तळव्यांच्या बिंदूंवरती प्रेशर पडल्याने ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होते आणि आपल्या शरीरातील विविध अंगांना स्वस्थ राहण्यास मदत मिळते. त्याचबरोबर मालिश केल्याने तुमच्या शरीरामध्ये हिट निर्माण होते.

7. पायांच्या तळव्यांची मालिश केल्याने फुटलेल्या टाचांपासून आराम मिळतो. त्याचबरोबर मॉलिश केल्याने तुमचे पाय मुलायम बनतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com