Motorola Edge 70 Pro launch google
लाईफस्टाईल

Smartphone 2026: 6500mAh बॅटरी अन् 50MP सोनी सेन्सर; दमदार फिचर्ससह Motorola Edge 70 Pro लाँच, किंमत वाचा

Tech Latest News : Motorola Edge 70 Pro स्मार्टफोन 6500mAh बॅटरी, 50MP सोनी कॅमेरा आणि दमदार प्रोसेसरसह सादर झाला आहे. उत्कृष्ट फोटोग्राफी, गेमिंग आणि प्रीमियम डिझाइनचा अनुभव देणारा हा फोन आहे.

Sakshi Sunil Jadhav

motorola edge 70 pro स्मार्टफोन फोटोग्राफीमध्ये एक नवीन ओळख निर्माण करत आहे. या स्‍मार्टफोनमधील ट्रिपल 50 मेगापिक्‍सल प्रो-ग्रेड कॅमेरा सिस्टम खास करून रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशात सुस्‍पष्टपणे फोटो काढण्यासाठी बनवण्यात आली आहे. यात ५० मेगापिक्‍सल सोनी एलवायटीआयए™ 710 सेन्सर, ओआयएस व मोटोएआय तंत्रज्ञान आहे. याव्यतिरिक्त, यात 50 मेगापिक्‍सल अल्ट्रावाईड + मॅक्रो कॅमेरा आणि ऑटो फोकस असलेला 50 मेगापिक्‍सल क्वाड पिक्‍सल सेल्फी कॅमेरा आहे. तसेच, यात पॅन्‍टोन™ व्‍हॅलिडेटेड कलर्स, स्किनटोन™ अचूकता आहे आणि सर्व कॅमेऱ्यांमधून कोणत्याही प्रकाशात 4के 60एफपीएस व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते.

मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 एक्‍स्‍ट्रीमची शक्ती असलेला motorola edge 70 pro फ्लॅगशिप-ग्रेड कार्यक्षमता देतो, ज्‍यामध्‍ये प्रगत ऑन-डिवाईस एआय आणि अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्टपणे फोटोज कॅप्‍चर करण्‍याच्‍या क्षमता आहेत. जवळपास 12 जीबी एलपीडीडीआर5एक्‍स रॅम आणि 256 जीबी यूएफएस 4.1 स्‍टोरेज, तसेच प्रगत वेपर चेंबर कूलिंग सिस्‍टमसह हा स्‍मार्टफोन अत्‍यंत गतीशील मल्‍टीटास्किंग, सुलभ गेमिंग आणि सतत प्रतिसादात्‍मक कार्यक्षमतेची खात्री देतो.

motorola edge 70 pro मध्‍ये कलेक्‍शन्‍स बाय मोटोरोला सादर करण्‍यात आले आहे, ज्‍यामध्‍ये नवीन प्रीमियम डिझाइनहस लक्‍झरीअस सॅटिन-लक्‍स, टेलर्ड फॅब्रिक आणि मार्बल फिनिशेस् आहेत, ज्‍याला पूरक पॅन्‍टोन™ निर्मित रंग आहेत, ज्‍यामधून आकर्षक व वैशिष्‍ट्यपूर्ण स्‍टाइल दिसून येते.

motorola edge 70 pro मध्‍ये जवळपास 144 हर्ट्झ 1.5के ट्रू कलर क्वाड-कर्व्‍ह डिस्‍प्‍ले, पॅन्‍टोन™ सत्‍यापनासह स्किनटोन™ अचूकता, आकर्षक 6.8 इंच सुपर एचडी (1.5के) एएमओएलईडी पॅनेलसह सेगमेंटमधील अग्रणी 5200 नीट्स पीक ब्राइटनेस आणि एचडीआर10+ सपोर्ट आहे. तसेच अधिक टिकाऊपणासाठी कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास 7आयचे संरक्षण आहे.

या स्‍मार्टफोनच्‍या अत्‍यंत सडपातळ डिझाइनमध्‍ये विशाल 6500 एमएएच सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे, जी जवळपास 51 तासांपर्यंत कार्यरत राहते, ज्‍याला 90 वॅट टूर्बोपॉवर™ फास्‍ट चार्जिंगचे पाठबळ आहे, जे फक्त 9 मिनिटांच्‍या चार्जिंगमध्‍ये संपूर्ण दिवसभर स्‍मार्टफान कार्यरत राहण्‍याची खात्री देते.

motorola edge 70 pro 29th April 2026 पासून Flipkart, Motorola.in, आणि आघाडीच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असेल. या स्‍मार्टफोनची प्रभावी लॉंच किंमत फक्त INR 36,999* पासून सुरू होते.

motorola edge 70 pro मध्ये आकर्षक 6.8 इंच 144 हर्ट्झ 1.5के ट्रू कलर क्वाड-कर्व्ह डिस्प्ले आहे, जो उत्कृष्ट प्रतिसादासह विलोभनीय एज-टू-एज व्ह्यूइंग अनुभव देतो. पँटोन™ व्हॅलिडेटेड डिस्प्ले आणि पँटोन™ स्किनटोन™ व्हॅलिडेशनसह, हा स्क्रीन निर्मात्यांच्या कल्पनेनुसार हुबेहूब रंग आणि त्वचेचे अचूक टोन प्रदर्शित करतो. या डिस्प्लेमध्ये 5200 नीट्स पीक ब्राइटनेसमुळे बाहेरच्या उजेडातही स्क्रीन स्पष्ट दिसतो, तर एचडीआर10+, 100 टक्‍के डीसीआय-पी3 कलर गॅमट आणि 10-बीट कलर डेप्थमुळे चित्रे अधिक दोलायमान आणि सिनेमॅटिक दिसतात. डॉल्बी अॅटमॉस® आणि हाय-रिझॉल्‍युशन ऑडिओसह ड्यूअल स्टिरिओ स्पीकर्समुळे हा अनुभव अधिक समृद्ध होतो, तर कॉर्निंग® गोरिल्ला® ग्लास 7आय दैनंदिन वापरासाठी अधिक टिकाऊपणाची खात्री देते.

अल्ट्रा-स्लिम आकार असूनही, motorola edge 70 proप्रो मध्ये विशाल 6500 एमएएच सिलिकॉन-कार्बन बॅटरी देण्यात आली आहे, जी कामगिरीशी कोणतीही तडजोड न करता जवळपास 51 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देण्यास सक्षम आहे. विनासायास स्ट्रीमिंग, गेमिंग, 4के रेकॉर्डिंग, व्हिडिओ कॉल्स आणि सोशल मीडिया वापरासाठी डिझाइन केलेली ही प्रगत सिलिकॉन-कार्बन तंत्रज्ञानाची बॅटरी स्‍मार्टफोनच्या स्लिम प्रोफाइलमध्येही दीर्घकाळ टिकते. यासोबत 90 वॅट टूर्बोपॉवर™ चार्जिंग मिळते, जे अवघ्या 9 मिनिटांच्‍या चार्जिंगमध्‍ये स्‍मार्टफोन दिवसभर कार्यरत राहण्‍याची खात्री देते, ज्यामुळे वापरकर्ते स्‍मार्टफोनचार्ज करून कोणत्याही व्यत्ययाशिवाय कामात व्यस्त राहू शकतात.

motorola edge 70 pro टिकाऊपणाच्या सर्वोच्‍च लष्करी मानकांनुसार डिझाइन करण्‍यात आला आहे. या डिवाईसने एमआयएल-810एच मिलिटरी ग्रेड प्रमाणित संरक्षणाच्या 16 चाचण्या यशस्वीपणे पार केल्या आहेत. हा स्‍मार्टफोन दिसायला आणि वापरताना अत्यंत सुबक व मोहक वाटतो. हा स्‍मार्टफोन -20° सेल्सिअसच्या कडाक्याच्या थंडीपासून 60° सेल्सिअसच्‍या कडक उन्हापर्यंत, अगदी उन्हात उभ्या असलेल्या कारमधील प्रचंड तापमानातही सुरक्षित राहतो. तसेच, हा डिवाईस 95 टक्‍क्‍यांपर्यंत आर्द्रतेचा सामना करू शकतो. धूळ, घाण, वाळू आणि पाण्याच्या उच्‍च दाबापासून संरक्षणासाठी यात आयपी68 आणि आयपी69 ही सर्वोच्‍च रेटिंग्स देण्यात आली आहेत. हा डिवाईस 1.5 मीटर गोड्या पाण्यात 30 मिनिटांपर्यंत बुडालेला राहिला तरी सुरक्षित राहू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्षकांच्या वेतनात बदल, साताऱ्यात होणार IT पार्क; फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय

Maharashtra News Live Update: घायल हूँ, इसलिए घातक हूँ"..! ईडीच्या फेऱ्यातून कोर्टाने सुटका झाल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Riteish and Genelia: 'लालपरी'ला नवं ग्लॅमर! रितेशभाऊ अन् जिनिलिया वहिनी MSRTC चे नवे ब्रँड अॅम्बेसिडर

Beed : बीडमध्ये संतापजनक प्रकार! १६ वर्षीय मुलीचा बालविवाह, ६ महिन्यांच्या गरोदर पीडितेचा जबरदस्ती गर्भपात

Byculla-Mazgaon Flyover: भायखळा ते CSMT फक्त १० मिनिटांत; दोन नवीन उड्डाणपूल बांधणार; कसा असणार मार्ग?

SCROLL FOR NEXT