Stomach cancer saam tv
लाईफस्टाईल

Stomach cancer : सकाळी वॉशरूममध्ये दिसून येतात पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं; शरीरातील बदल ओळखून वेळीच डॉक्टरांची मदत घ्या

Warning Signs Of Stomach Cancer: सध्या पोटाच्या कॅन्सरच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होतेय. अनेकदा लोकांना पोटाच्या कॅन्सरचं निदान खूप उशीरा किंवा शेवटच्या टप्प्यावर होते.

Surabhi Jayashree Jagdish

4 फेब्रुवारी रोजी जागतिक कॅन्सर डे म्हणून ओळखला जातो. कॅन्सर गंभीर आणि प्राणघातक असू शकतो. दुसरीकडे कॅन्सरच्या रुग्णांमध्येही दरवर्षी झपाट्याने वाढ होतेय. लोकांची जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो. कॅन्सर शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. सध्या पोटाच्या कॅन्सरच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होतेय. अनेकदा लोकांना पोटाच्या कॅन्सरचं निदान खूप उशीरा किंवा शेवटच्या टप्प्यावर होते. ज्यामुळे रुग्णाची स्थिती गंभीर होऊ शकते.

पोटाच्या कॅन्सरची लक्षणं सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत नाहीत. त्यामुळे रुग्णांना कॅन्सरचं निदान खूप उशिरा होतं. पोटाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या लोकांचा जीव वाचवणं डॉक्टरांना कठीण होऊ शकते. त्यामुळे रुग्णांनी स्वत:च त्यांच्या आरोग्यातील बदलांकडे लक्ष देणं आणि पोटाच्या कर्करोगाची लक्षणे ओळखणे आवश्यक आहे.

जसं पोटाच्या कॅन्सरची काही लक्षणं सकाळी दिसतात. तुम्ही वॉशरूमध्ये जाता तेव्हा तुम्हाला ही लक्षणं दिसू शकतात. तुम्हाला दररोज काही इतर लक्षणं देखील जाणवू शकतात. पोटाच्या कॅन्सरच्या या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

पोटाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती? ( Early Symptoms Of Stomach Cancer)

  • अपचनाची समस्या

  • पोटात गॅस होणं

  • पोट फुगणं

  • अचानक वजन कमी होणं

  • कमी भूक

  • पोटदुखी

  • शौचातून रक्त

पोटाच्या कॅन्सरची सुरुवात पोटात ट्यूमर बनण्यापासून होते. हा ट्यूमर झपाट्याने शरीराच्या इतर भागात पसरतो. त्यामुळे पोटाच्या गाठीवर वेळीच उपचार सुरू करणं गरजेचं आहे. पोटाच्या कर्करोगाची लक्षणं गंभीर झाल्यास आणि ट्यूमर वाढल्यास कॅन्सर घातक ठरू शकतो.

काय उपाय करावेत? (How to prevent stomach cancer)

  • पोटाच्या कॅन्सरशी संबंधित लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • ज्या लोकांच्या कौटुंबिक इतिहासात कॅन्सर असेल त्यांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.

  • मद्यपान आणि धूम्रपान टाळा .

  • जंक फूड आणि फास्ट फूडचं सेवन करू नका.

  • अशा खाद्यपदार्थांमध्ये मिसळलेली रसायनं, प्रिझर्वेटिव्ह्ज इत्यादींमुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

  • निरोगी आहाराचा अवलंब करा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT