Morning Walk Mistakes Fatal saam tv
लाईफस्टाईल

Morning Walk Dangers : तुमचा मॉर्निंग वॉक ठरू शकतो जीवघेणा; 90% लोकं करतात या चुका

Morning Walk Mistakes Fatal: तुम्हीही मॉर्निंग वॉकला जाताय? सकाळच्या वेळी पायी चालणं आरोग्यासाठी उत्तम आहे. मात्र यावेळी तुम्ही कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पायी चालणं हे आरोग्यासाठी योग्य उत्तम असतं. यामध्ये सकाळच्या वेळी पायी चालणं अमृत मानलं जातं. सकाळच्या वेळी ताजी हवा, सूर्याची किरणं या गोष्टी तुमच्या शरीराला फीट ठेवण्यास मदत करतात. मात्र तुम्हाला माहितीये का मॉर्निंग वॉकवेळी तुमच्याकडून नकळत काही चुका होतात. आणि या चुकांमुळे तुमच्या आरोग्याला अनेक तोट्यांचा सामना करावा लागतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, या चुकांवर तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही सकाळी पायची चालण्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. मॉर्निंग वॉकवेळी कोणत्या चुका होऊ शकतात हे पाहूयात.

वॉर्म-अप शिवाय पायी चालणं

काही लोकं सकाळी थेट वेगाने चालण्यास सुरुवात करतात. मात्र तुमच्या शरीरासाठी हे धोकादायक ठरू शकतो. वॉर्म अप केल्याशिवाय वॉकिंग केल्याने मसल्समध्ये तणाव किंवा सांध्यामध्ये वेदना होऊ शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वॉकिंगपूर्वी ५ ते १० मिनिटं हलकं स्ट्रेचिंग केलं पाहिजे.

चुकीच्या शूजचा वापर

अनेकजण घरात खराब झालेली किंवा जुनी चप्पल घालून वॉक करतात. मात्र यामुळे तुमचे पाय, कंबर आणि गुडघ्यांना त्रास होण्याचा धोका असतो. यामुळे तुम्हाला दिर्घकाळ पायाच्या समस्यांना देखील सामोरं जावं लागतं. त्यामुळे वॉकवेळी चांगल्या क्वालिटीचे शूज वापरावे.

रिकाम्या पोटी किंवा भरपेट वॉक

मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी लोक अनेकदा खाण्याबाबत चुका करतात. काही लोक रिकाम्या पोटी फिरायला जातात, ज्यामुळे अशक्तपणा किंवा चक्कर येण्याचा धोका असतो. तर काही लोक हेवी नाश्ता केल्यानंतर लगेच फिरायला जातात, ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे चालण्यापूर्वी केळी, थोडे बदाम किंवा हलका नाश्ता केला पाहिजे.

चुकीच्या वेळी वॉक

सकाळी फिरायला जाण्याची वेळ देखील महत्त्वाची आहे. खूप लवकर किंवा खूप उशिरा चालणं तुम्हाला निसर्गाच्या पूर्ण फायद्यांपासून वंचित ठेवतं. सूर्योदयाच्या वेळी फिरायला जाणं चांगलं मानलं जातं. याचं कारण यावेळी हवा ताजी असते आणि सूर्यकिरणांमधून व्हिटॅमिन डी मिळतं.

हायड्रेशन

चालताना पाणी न पिणं ही एक सामान्य चूक आहे. बरेच लोक चालण्यापूर्वी, दरम्यान किंवा नंतर पुरेसं पाणी पित नाहीत, ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. त्यामुळे फिरायला जाण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या किंवा पाण्याची बाटली सोबत ठेवा.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi : आंबट दही फेकून देऊ नका,  ५०% लोकांना फायदे माहीतच नाहीत, ५ वा उपाय थेट पैसे वाचवेल

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT