Morning Breakfast Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Breakfast Recipe: ५ मिनिटांत तयार होणारा हा नाश्ता तुम्ही कधीच खाल्ला नसेल; वाचा रेसिपी

Morning Breakfast Recipe: रोज सकाळी सर्वांच्या घरात घाईगडबड असते. घरातील लहान मुलाचा शाळेचा डबा, नवऱ्याचा डबा आणि स्वतः साठी जेवण हे सर्व घरातील महिलेला बनवायचे असते. त्यामुळे अनेकदा रोज सकाळी नाश्त्याला काय बनवावे याबाबत प्रश्न पडलेला असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोज सकाळी सर्वांच्या घरात घाईगडबड असते. घरातील लहान मुलाचा शाळेचा डबा, नवऱ्याचा डबा आणि स्वतः साठी जेवण हे सर्व एका स्त्रीला बनवायचे असते. त्यामुळे अनेकदा रोज सकाळी नाश्त्याला काय बनवावे याबाबत प्रश्न पडलेला असतो. रोज सकाळी प्रत्येकाला काहीतरी नाश्त्यासाठी काहीचरी नवीन पदार्थ हवा असतो. परंतु नवनवीन पदार्थ बनवायला वेळ नसतो.त्याचसोबत झटपट होणारा पौष्टिक पदार्थ काय बनवायचा याबाबत घरातील महिलेच्या मनात प्रश्न असतो. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या रेसिपी सांगणार आहोत.

पराठा

पराठा बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यायचे आहेत.यानंतर हिरवी मिरची, धणे, आले लसूण पेस्ट हे मिश्रण बारीक करुन घ्या. उकडलेल्या बटाट्यात हे मिश्रण टाकावे. त्यानंतर हे मिश्रण मॅश करु घ्यावे. एकीकडे गव्हाचे पीठ मळून घ्यावे. हे पीठ थोडे घट्ट असेन याची काळजी घ्या. त्यानंतर पीठाचा गोलाकार आकार करुन घ्या. त्यात बटाट्याचे मिश्रण टाका आणि गोलाकार पराठा लाटून घ्या. यानंतर तव्यावर पराठा छान भाजून घ्यावा. तुम्ही हा पराठा हिरवी चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकता.

रवा अप्पे

रवा अप्पे हे खूप पटकन बनवतात. सकाळी सकाळी कमी वेळात तुम्ही हा चटपटीत नाश्ता बनवू शकता. यासाठी तुम्हाला एका कढईत चना डाळ, कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी द्या. त्यानंतर एका बाजूला रवा भाजून घ्या. हा रवा थंड झाल्यावर त्यात दडी आणि किसलेले गाजर घाला. आवश्यकतेनुसार मीठ घाला. मीठ घातल्यानंतर त्यात पाणी घाला. इडलीच्या पीठासारखे हे पीठ तयार करा. त्यात तुम्ही सोडा मिक्स करा. यानंतर अप्पे तयार करायच्या भांड्याला तेल लावा. हे मिश्रण त्या भांड्याच टाका. यानंतर थोडा वेळ शिजवून घ्या. तुम्ही हे अप्पे खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात.

ओट्स चिला

ओट्स चिला ही एक पौष्टिक रेसिपी आहे. यासाठी तुम्ही सर्वप्रथम ओट्स आणि रवा भाजून घ्यायचा. त्यात बेसन, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि धणे घाला. यात मीठ, जिरे आणि पाणी घालून योग्य मिक्स करा. हे मिश्रण जास्त पातळ करु नका. त्यानंतर हे मिश्रण तव्यावर गोलाकार आकारात घाला. त्यानंतर चिला योग्य भाजल्यानंतर तो तुम्ही गरमागरम खाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT