Oats Dosa: डाएट करताय? मग घरच्या घरी बनवा हेल्दी ओट्स डोसा; रेसिपी पाहा

Recipe: वजन कमी करण्यासाठी ओट्स खाण्याचा सल्ला दिला जातो.
Oats Dosa
Oats DosaSaam Tv
Published On

Oats Dosa Recipe:

सध्या सर्वजण आरोग्याची खूप जास्त काळजी घेतात. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अनेकदा लोक आजारी पडतात. त्यामुळे लोक आता हेल्दी फूड खाण्यावर जास्त भर देतात. हेल्दी फूडमध्ये अनेक लोक सलाड, फ्रुट्स, ओट्स खातात. परंतु कधीकधी ओट्स खायला खूप कंटाळा येतो. अशा वेळी तुम्ही ओट्य डोसा खाऊ शकतात.

वजन कमी करण्यासाठी ओट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. ओट्स खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो. काहीतरी वेगळं खायचं मन होतं. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला ओट्स डोसाची रेसिपी सांगणार आहोत.

साम्रगी

  • ओट्स

  • दही

  • तेल

  • तूप

  • पाणी

  • मीठ

Oats Dosa
Hair Care Tips : हिवाळ्यात केसगळतीच्या समस्येने त्रस्त, चेहऱ्यावर सतत डाग येताय? आवळ्याचा असा करा वापर

कृती

  • सर्वप्रथम ओट्स घ्या. त्यात थोडे पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.

  • त्यानंतर या मिश्रणात थोडं दही घाला. मीठ घालून हलवून घ्या.

  • नॉन स्टिक पॅन गरम करा. त्यानंतर त्यावर थोडं तेल टाका.

  • गरम तव्यावर हे मिश्रण डोसासारखे पसरवून घ्या.

  • त्यानंतर तुम्ही त्यावर तूप किंवा तेल टाकू शकता. तेल किंवा तूप चांगले पसरुन घ्या.

  • डोसा एका बाजूने चांगला भाजून घ्या.

  • त्यानंर खोबऱ्याची चटणी किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत खाऊ शकता.

ओट्स डोसा करताना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवरचे ओट्स वापरु शकतात. बाजारात मसाला ओट्स, टॉमेटो फ्लेवर ओट्स असे अनेक प्रकार असतात. त्यामुळे डोसा अगदी स्वादिष्ट होईल. आपण नेहमीच तांदळाचा डोसा खातो. परंतु तुम्ही या डाएट डोसा ट्राय करा.

Oats Dosa
Bank Holiday In December 2023 : शेवटच्या महिन्यात 18 दिवस राहणार बँका बंद, एका क्लिकवर पाहा सुट्ट्यांची यादी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com