Vishal Gangurde
सकाळच्या नाश्त्यासाठी मुरमुरे अप्पे हा उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ हेल्दी, टेस्टी आणि पचायलाही हलका आहे.
मुरमुरे अप्पे बनविण्यासाठी एका भांड्यात मुरमुरे स्वच्छ धुवून ५ मिनिटांसाठी भिजत ठेवा.
दुसऱ्या भांड्यात रवा आणि पाणी एकत्रितपणे मिसळा. त्यानंतर ५ मिनिटांसाठी तसेच ठेवा.
एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले मुरमुरे, रवा आणि दही घाला. त्यानंतर त्याची पेस्ट बनवा.
मिक्सर भांड्यात तयार बॅटर दुसऱ्या भांड्यात काढून घ्या. त्यानंतर त्यात कांदा, टोमॅटो , हिरवी मारची, लाल तिखट घालून मिक्स करा.
एकजीव झालेल्या बॅटरमध्ये सोडा, चवीनुसार मीठ आणि एक चमचा लिंबाचा रस घाला. त्यानंतर एकजीव करा.
गॅस सुरु करून अप्पे पात्र हे मध्यम आचेवर ठेवा. त्यानंतर अप्पे पात्राला तेल लावून बॅटर टाका. त्यानंतर दोन मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवा.
अप्पे एका बाजून शिजल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही शिजवून घ्या.
तुमचे अप्पे शिजल्यानंतर गरमागरम अप्पे हे खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.
Next : मधूमेह नियंत्रण करण्यासाठी आवळा गुणकारी; जाणून घ्या फायदे