Karela Recipe Cooking Tips : कारल्याच्या भाजीतला कडवटपणा ५ मिनिटांत गायब करण्याची ट्रिक; लहान मुलंही करतील फस्त

Cooking Tips: कारल्यामधील बिया काढल्यावर त्याला मीठ चोळून ठेवू शकता. किमान आर्धा तास तरी मीठ लावून ठेवा. यामुळे कारल्यामधील कडूपणा निघून जाण्यास मदत होईल.
Cooking Tips
Karela Recipe Cooking TipsSaam TV

सध्या उन्हाळा सुरू आहे. अशात अनेक व्यक्तींना हाय ब्लडप्रेशर आणि शुगरच्या समस्या जाणवतात. त्यामुळे डॉक्टरांकडून अशा रुग्णांना कायम विविध भाज्यांसह कारले देखील खाण्याचा सल्ला देतात. कारल्यामध्ये असलेल्या कडवटरपणामुळे ते खाणे कुणालाच आवडत नाही. सर्वजण कारलं खाण्याचा कंटाळा करतात. त्यामुळे आज कारल्यातील कडूपणा कसा घालवायचा याची माहिती जाणून घेऊ.

Cooking Tips
Dahi Poha Recipe : रोजचे बोरींग पोहे बनवा यम्मी; जाणून घ्या लज्जतदार रेसिपी

मीठ लावून ठेवा

कारल्यातील कडवटपणा काढून टाकण्यासाठी तुम्ही मीठाचा वापर करू शकता. कारल्याचे बारीक काप करून तुम्ही ते मिठाच्या पाण्यात भिजत घालू शकता. किंवा कारल्यामधील बिया काढल्यावर त्याला मीठ चोळून ठेवू शकता. किमान आर्धा तास तरी मीठ लावून ठेवा. यामुळे कारल्यामधील कडूपणा निघून जाण्यास मदत होईल.

बीया काढून टाका

कारल्यातील सर्वात कडूपणा त्याच्या बियांमध्ये असतो. बीया काढल्यास त्यातील कडूपणा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कारल्याची भाजी बनवताना त्यातील बीया काढून टाका आणि कारलं स्वच्छ धुवून घ्या.

साल सोलून घ्या

कारल्याची भाजी बनवताना त्याच्या बियांसह साली देखील काढून घ्या. कारल्याची साल छान सोलल्याने यातील कडूपणा निघून जातो. कारल्याची साल फार कडू असते. त्यामुळे भाजी बनवण्याआधी त्यावर टोकदार असलेला भाग देखील किसनीवर सोलून घ्यावा.

दही

कारल्याचा कडवटपणा निघून जावा यासाठी कारलं दह्यातही भिजत ठेवू शकात. दह्याची आंबट चव आणि यातील जीवनसत्व कारल्यामधील कडूपणा शोशून घेतात. फक्त भाजी बनवण्याआधी कारले स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे.

Cooking Tips
High Calcium Foods : दूधापेक्षा जास्त कॅल्शिअम असलेले पदार्थ; लहान मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल अन् हाडं होतील मजबूत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com