Dahi Poha Recipe: रोजचे बोरींग पोहे बनवा यम्मी; जाणून घ्या लज्जतदार रेसिपी

Breakfast Recipes in Marathi: दही पोहा शरीरासाठी फार फायदेशीर आहे. ज्या व्यक्तींना पोटासंबंधीत समस्या असतील, पोट निट साफ होत नसेल, अन्यथा सतत भूक लागत असेल तसेच डायेट करणाऱ्या व्यक्तींसाठी
दही पोहा
Dahi Poha RecipeSaam TV
Published On

सकाळच्या नाश्त्याला अनेक व्यक्ती पोहे खातात. हलके-फुलके पोहे पचण्यासाठी चांगले असतात. त्यामुळे तुम्ही देखील रोजच्या नाश्त्याला पोहे खात असाल. पण दररोज पोहे खाऊन काही व्यक्ती बोर होतात. त्यामुळे त्यांच्यासाठी पोह्यांची एक टेस्टी आणि हटके रेसिपी आम्ही शोधली आहे.

दही पोहा
Chana Dal Ladu Recipe: चन्याच्या डाळीचे बनवा मऊसूत लाडू; सोपी रेसिपी वाचा

दही पोहा शरीरासाठी फार फायदेशीर आहे. ज्या व्यक्तींना पोटासंबंधीत समस्या असतील, पोट निट साफ होत नसेल, अन्यथा सतत भूक लागत असेल, तसेच डायेट करणाऱ्या व्यक्तींसाठी देखील हा पदार्थ अत्यंत फायदेशीर आहे.

साहित्य

  • एक कप पोहे

  • कांदा

  • टोमॅटो

  • डाळींबाचे दाणे

  • कडीपत्ता

  • शेंगदाणे

  • हिरवी मिरची

  • जिरे

  • तेल

  • मीठ

दही पोहा
Paneer Shawarma Recipe: यम्मी! रेस्टॉरंट स्टाइल शोरमा घरच्याघरी कसा बनवायचा; वाचा सिक्रेट रेसिपी

कृती

  • ही रेसिपी बनवण्याची कृती देखील फार सोप्पी आहे. एक पाणी घ्या आणि रात्रीच पोहे भिजत ठेवा. जर तुम्हाला जास्त जड असलेले पोहे नको असतील तर पोहे बनवण्याच्या आधी २ तास पाण्यात भिजत ठेवा.

  • पोहे भिजत आहेत तोवर कांदा, टोमॅटो आणि विविध भाज्या एकदम बारीक चिरून घ्या. त्यानंतर थोडं पाणी टाकून सर्व भाज्या वाफेवर शिजवा. पुढे एका पॅनमध्ये तेल घ्या. त्यात आधी जिरे आणि कडीपत्ता चांगले तडतडू द्या. त्यानंतर त्यात शेंगदाणे, कांदा, इंतर भाज्या, मिरच्या देखील टाकून घ्या.

  • त्यानंतर तयार पोहे यात मिक्स करा. या रेसिपीमध्ये तुम्ही डाळींब देखील मिक्स करू शकता. तुमच्या आवडीनुसार यात साखर आणि मिठ तसेच विविध चाट मसाले अॅड करा. रोज सकाळी देखील हा नाश्ता खाल्ला तरी तुम्ही बोर होणार नाही. हा नाश्ता घरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com