Wakefit Great Indian Sleep Scorecard 2024 Report Saam Tv
लाईफस्टाईल

Mumbai News: निम्‍म्‍याहून अधिक मुंबईकर रात्री उशिरापर्यंत करतात जागरण, 32 टक्के लोकांना झाला झोपेचा आजार, अहवालात माहिती उघड

Sleep Scorecard 2024 Report: डी२सी स्‍लीप व होम सोल्‍यूशन्‍स प्रदात्‍याने नुकतेच त्‍यांच्‍या ग्रेट इंडियन स्‍लीप स्कोअरकार्ड (जीआयएसएस) २०२४चा ७वा अहवाला सादर केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Wakefit Great Indian Sleep Scorecard 2024 Report:

वेकफिट.को (Wakefit.co) या भारतातील सर्वात मोठ्या डी२सी स्‍लीप व होम सोल्‍यूशन्‍स प्रदात्‍याने नुकतेच त्‍यांच्‍या ग्रेट इंडियन स्‍लीप स्कोअरकार्ड (जीआयएसएस) २०२४चा ७वा अहवाला सादर केला आहे. यंदाच्‍या सर्वेक्षणामधून मुंबईतील झोपेचे ट्रेण्‍ड्स व पद्धतींबाबत नवीन माहिती निदर्शनास आली. या अहवालामधील निष्कर्षानुसार, जवळपास पन्‍नास टक्‍के मुंबईकर रात्री ११ नंतर झोपतात. तसेच मुंबईतील ५५ टक्‍के व्‍यक्‍तींना सकाळी उठल्‍यानंतर रिफ्रेश वाटत नाही. ज्‍यामध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या ४९ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत वाढ झाली आहे. या अहवालामधील अतिरिक्‍त माहिती पुढे देण्‍यात आली आहे.

रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, सकाळच्‍या वेळी थकवा जाणवणे

या अहवालामधून निदर्शनास आले की, मुंबईतील ४६ टक्‍के व्‍यक्‍ती रात्री ११ नंतर झोपतात, ज्‍यामधून रात्री उशिरापर्यंत केल्‍या जाणाऱ्या क्रियाकलापांचा प्रचलित ट्रेण्‍ड दिसून येतो. मुंबईतील रात्री उशिरापर्यंत जागे राहण्‍याच्‍या प्रमाणामधून ५५ टक्‍के व्‍यक्‍तींना सकाळी उठल्‍यानंतर रिफ्रेश न वाटण्‍याचे दिसून येते. या अहवालामधून निदर्शनास आले की, ८९ टक्‍के मुंबईकर रात्रीच्‍या वेळी १ ते २ वेळा उठतात. झोपेचा दर्जा खालावत जाण्‍याच्‍या लक्षणांमूधन ३२ टक्‍के मुंबईकरांनी झोपेचा आजार झाल्‍याचे सांगितले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियाचा अतिवापर

झोपण्‍याच्‍या किमान एक तास अगोदर डिजिटल डिवाईसेस न पाहणे हे उत्तम झोपेसाठी आवश्‍यक आहे. तरीदेखील ९० टक्‍के मुं‍बईकर झोपण्‍यापूर्वी फोनचा नियमितपणे वापर करतात. या अहवालामधून निदर्शनास आले की ५२ टक्‍के मुंबईकर रात्री उशिरापर्यंत जागे राहण्‍यासाठी ओटीटी व सोशल मीडिया हे प्रमुख कारण आहेत. या ट्रेण्‍ड्समधून डिजिटल डिवाईसेसच्‍या वापरामुळे झोपेवर होणारे परिणाम दिसून येतात. (Latest Marathi News)

काम, चिंता आणि थकवा

या अहवालामधून निदर्शनास आले की, मुंबईतील जवळपास ३० टक्‍के कर्मचारी कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. तसेच, ५७ टक्‍के मुंबईकरांना कामकाजाच्‍या वेळी थकल्‍यासारखे व झोप आल्‍यासारखे वाटते. यामधून झोपमोडचा त्‍यांच्‍या उत्‍पादकतेवर आणि आरोग्‍यावर होणारा परिणाम दिसून येतो. तज्ञांच्‍या मते, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे हे दिवसा झोप येण्‍याचे प्रमुख कारण आहे. ज्‍यामुळे व्‍यक्‍ती कामाच्‍या वेळी काहीशी डुलकी घेण्‍याच्‍या प्रमाणात वाढ होत आहे.

पुरेशी झोप घेण्‍याच्‍या दिशेने पुढाकार

झोपेचा दर्जा सुधारण्‍यासाठी मुंबईकरांचा काही विशिष्‍ट सवयी अंगिकारण्‍याचा वाढता कल आहे. ३७ टक्‍के मुंबईकरांचा विश्‍वास आहे की, झोपेच्‍या अगोदर डिजिटल डिवाईसेचा वापर न केल्‍यास उत्तम झोप मिळण्‍यास मदत होईल. तसेच, २८ टक्‍के मुंबईकरांचा विश्‍वास आहे की दर्जेदार मॅट्रेस खरेदी केल्‍यास झोपेचा दर्जा सुधारू शकतो. यामधून आरामदायी झोपेसाठी झोपेसंबंधित वातावरणाच्‍या महत्त्वाबाबत वाढती जागरूकता दिसून येते. या अहवालामधील निष्‍पत्तींमधून झोपेच्‍या आरोग्‍यदायी सवयी अंगिकारण्‍याचे आणि मुंबईकरांची होणारी झोपमोड टाळण्‍यासाठी झोपेसंबंधित अनुकूल वातावरण असण्‍याचे महत्त्व दिसून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : एसआरए इमारतीत BMC कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, मुंबईत धक्कादायक घटना

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल योजनेसाठी १० टक्के वाळू मोफत मिळणार

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT