LDLC saam tv
लाईफस्टाईल

४० टक्क्यांपेक्षा जास्त रूग्णांना कोलेस्ट्रॉलच्या पातळीबाबत माहितीच नाही; मुंबईतील डॉक्टरांची धक्कादायक माहिती

प्रत्येक व्यक्तीने बॅड कोलेस्ट्रॉलचं गणित समजून घेणं आवश्यक आहे. यासाठी काही प्रकारच्या टेस्ट करणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमच्या हृदयाचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक समस्या मागे लागल्या आहेत. यामध्ये चुकीचा आणि अवेळी आहार घेतल्याने कोलेस्ट्रॉल आणि हृदयासंबंधीच्या समस्या वाढत असल्याचं दिसून आलं आहे. हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी फक्त आहार आणि व्यायाम इतकंच सांभाळणं पुरेसं नसतं. यावेळी प्रत्येक व्यक्तीने बॅड कोलेस्ट्रॉलचं गणित समजून घेणं आवश्यक आहे.

कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय)च्या मते, एलडीएलसीची वाढलेली पातळी हा जगभरात मृत्यूचं प्रमुख कारण असलेल्या हृदयविकारास कारणीभूत ठरणारा आघाडीचा घटक आहे. LDLC कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे. हे हृदयाशी संबंधित समस्यांना रोखण्याच्या दृष्टीने खूप गरजेचं मानलं जातं. यासाठी काही प्रकारच्या टेस्ट करणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमच्या हृदयाचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.

मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजिस्ट डॉ. झाकिया खान यांनी सांगितलं की, कोलेस्ट्रॉलचं मॅनेजमेंट करणं गरजेचं असून अनेकांना याबाबत माहितीही नसल्याचं समोर आलं आलं आहे. यावेळी जवळपास ३०-४० टक्‍के रुग्णांना त्यांच्या LDLC च्या पातळीविषयी कोणतीही माहिती नसतं. याशिवाय आपल्यासाठी LDLC चं प्रमाण काय असलं पाहिजे याबाबत तर त्याहूनही थोड्या माणसांना माहिती आहे, असं माझ्या निदर्शनास आलं आहे.

LDLC ची वाढलेली पातळी हा कोरोनरी आर्टरी समस्यांना कारणीभूत ठरणारा एक प्रमुख घटक आहे. ज्यामुळे नियमित लिपिड स्क्रिनिंग्जचं महत्त्व अधिकच अधोरेखित होतं. इतर गोष्टींबरोबरच लिपिड पॅनल, एलडीएलसी पातळी, वार्षिक आरोग्य तपासणी यांसारख्या चाचण्या आणि आपला रक्तदाब, साखरेची पातळी इत्यादी गोष्टी आकडे माहीत असणं या गोष्टींमुळे आम्हाला आमच्या रुग्णांसाठी उपचारांची सर्वोत्तम दिशा निश्चित करण्यात मदत होते.

लिपिड प्रोफाइल

लिपिड प्रोफाइल हे तुमच्या हृदयाचे प्रगती पुस्तक म्हणायला हरकत नाही. या चाचणीमध्ये एकूण कॉलेस्ट्रोल, एलडीएल कॉलेस्ट्रोल, एचडीएल कॉलेस्ट्रोल आणि ट्रायग्लिसाइड्स यांची मोजणी होते. ज्यातून तुम्हाला तुमच्या कॉलेस्ट्रोलची स्थिती समजते. कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय)च्या शिफारशीनुसार, वयाच्या १८व्या वर्षापासून आपल्या नियमित आरोग्य तपासणीचा भाग म्हणून ही चाचणी करून घेणं फायद्याचं ठरतं.

LDLC ची पातळी

सर्व एलडीएल कॉलेस्ट्रॉल सारखे नसून इप्सित एलडीएलसी पातळी माहीत असल्यास तुम्हाला आपल्या हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी आवश्यक माहिती मिळू शकते. एलडीएलसीची वाढलेली पातळी हे तुमच्या धमन्यांमध्ये प्लाक जमा करतं. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

तुमच्या चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार एलडीएलसीचं लक्ष्य निर्धारित करण्यास मदत होते. वय, कुटुंबाचा इतिहास आणि चालू स्थितींसारख्या धोक्याच्या घटकांच्या आधारे तुमचे डॉक्टर्स तुमचे व्यक्तिगत एलडीएलसी लक्ष्य निश्चित करण्याच्या काम तुमची मदत करू शकतीस. तुमच्या हृदयाचे आरोग्य जास्तीत-जास्त चांगल्या प्रकारे जपण्यासाठी जीवनशैलीतील बदल, औषधे यांचा सल्ला डॉक्टर देतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2025: गौरी- गणपती यांच्यात नातं काय आहे?

Pune Crime : काम व्यवस्थित कर... सततच्या सूचनांना कंटाळला, वैतागलेल्या वेटरनं हॉटेल चालकाला संपवलं

Hansal Mehta: टोरंटोमध्ये 'गांधी' वेब सिरिजच्या प्रदर्शनापूर्वी हंसल मेहता यांना मोठा धक्का, सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत म्हणाले...

समुद्राच्या खाली असं काय आहे ज्याचा सध्या NASA घेतेय शोध?

Manoj Jarange Morcha: मनोज जरांगे आंदोलनावर ठाम, मुंबईच्या वेशीवर पोहचण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं आरक्षणाबाबत मोठं आश्वासन

SCROLL FOR NEXT