Monthly Horoscope July 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Monthly Horoscope July 2023: जुलै महिना या राशींसाठी शुभ ! नोकरीत बढतीची शक्यता, प्रेमी जोडप्यांचे भांडण मिटेल...

July Rashi Bhavishya In Marathi : अनेकांच्या मेहनतीला यश मिळेल तर काहींच्या वाट्यात अपयशही येईल.

कोमल दामुद्रे

Monthly Horoscope July 2023 In Marathi : आजपासून जुलै महिना सुरु झाला आहे. या मध्ये अनेक महत्त्वाच्या ग्रहाचे संक्रमण देखील होत आहे. अनेकांच्या मेहनतीला यश मिळेल तर काहींच्या वाट्यात अपयशही येईल.

या महिन्यात मंगळाचे संक्रमण होणार असून बुध संक्रमण, शुक्र संक्रमण, सूर्य संक्रमण देखील होणार आहे. या सर्व ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा शुभ प्रभाव 5 राशीच्या लोकांवर राहील. या लोकांना करिअर, उत्पन्नाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. नात्यात आलेला दूरावाही मिटणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी जुलै महिना शुभ आहे.

1. मेष :

मेष राशीच्या लोकांसाठी जुलै महिना अत्यंत शुभ मानला जाणार आहे. या राशींच्या लोकांना आर्थिक (Money) लाभ मिळू शकतो. जीवनात अनेक सुखद बदल घडतील. कामाचे कौतुक होईल. उत्पन्नात वाढ होईल.

2. वृषभ :

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना चांगला असणार आहे. नोकरदारांना (Job) बढती आणि वेतनवाढ मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नात्यात आलेला दूरावा मिटेल.

3. सिंह :

सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ उताराचा असणार आहे. तुम्हाला अधिक सकारात्मक राहाण्याची गरज आहे. नवीन योजनेचा विचार कराल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

4. तूळ :

तूळ राशींच्या लोकांसाठी हा महिना अत्यंत शुभ असणार आहे. उत्पन्नात वाढ होईल. पैसे कमावण्याचे अनेक नवे मार्ग तयार होतील. प्रगती होईल. प्रेमसंबंधात (Love) अडचणी आल्या तरी त्यांना जपण्याचा प्रयत्न करा.

5. कुंभ :

या महिन्यात होणाऱ्या ग्रहांच्या संक्रमणामुळे कुंभ राशींच्या लोकांना अधिक लाभ मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. लव्ह लाईफ चांगली राहील. अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. माध्यम, संवाद, लेखन या क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन संधी मिळू शकतात.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसाचा मिरची पिकावर गंभीर परिणाम, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Tikona Fort History: महाराष्ट्राचा त्रिकोणी रत्न! तिकोना किल्ल्याचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि ट्रेकिंग अनुभव जाणून घ्या

Onion Ban: कांदा न खाण्याची अनोखी परंपरा! भारतातील 'या' ठिकाणी कांदा खात नाहीत

Bihar Election : बिहारमध्ये भाजप सत्तेत येणार, शरद पवारांच्या आमदाराने सांगितले गणित

महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भयंकर घडलं; माजी क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT