Monsoon Skin Care Saam tv
लाईफस्टाईल

Monsoon Oily Skin Care: पावसाळ्यात वारंवार चेहरा धुवूनही त्वचा तेलकट राहाते? हे घरगुती उपाय करुन पाहा, लगेच दिसेल फरक

Home Remedies for Oily Skin : बदलत्या ऋतूमुळे आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. यामुळे अनेक वेळा आपण आजारीही पडतो.

कोमल दामुद्रे

Oily Skin Care Tips : पावसाळ्यात अनेकांना त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेलकट त्वचेच्या समस्येने त्रस्त असतात. बदलत्या ऋतूमुळे आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. यामुळे अनेक वेळा आपण आजारीही पडतो. अशाच प्रकारची समस्या आपल्या त्वचेचीही होते. अशा अनेक महिला आहेत ज्यांची त्वचा तेलकट आणि चिकटच राहाते.

पावसाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या सर्वात जास्त होतात. याचे मुख्य कारण म्हणजे वातावरणातील आर्द्रता. त्यामुळे आपली त्वचा अधिक तेलकट होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरतो, पार्लरमध्ये जाऊन महागडे उपचार करून घेतो. मात्र त्यानंतरही त्वचेवर कोणताही परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही घरगुती पद्धती सांगणार आहोत. त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेऊ शकता.

1. मुलतानी माती फेस पॅक

जर तुमची त्वचा (Skin) तेलकट असेल तर अशा लोकांसाठी मुलतानी माती हा उत्तम पर्याय आहे. यामुळे त्वचेवरील पिंपल्सची (Pimples) समस्याही दूर होते, तसेच चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलही दूर होते आणि त्वचा चिकट राहत नाही. मुलतानी मातीत गुलाबजल व पाणी मिसळवून घ्या. चेहरा स्वच्छ धुवून हा फेस पॅक ३० मिनिटे राहू द्या. कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ (Clean) करा. हे लावल्याने तुमच्या त्वचेवरील तेल कमी होईल, तसेच तुमची त्वचा चमकू लागेल.

2. टोमॅटो

टोमॅटो (Tomato) त्वचेसाठी खूप चांगला आहे. त्यात असलेले थंड आणि तुरट सारखे घटक त्वचेवरील समस्या दूर करतात तसेच अतिरिक्त तेल काढून टाकतात. टोमॅटोमध्य भागी कापून चेहऱ्याला १५ ते २० मिनिटे लावा नंतर पाण्याने स्वच्छ करा. त्वचा चमकेल व अतिरिक्त तेलही कमी होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT