Oily Hair Home Remedies Saam Tv
लाईफस्टाईल

Oily Hair Home Remedies : पावसाळ्यात केस तेलकट होतात ? सतत केसांना खाज लागते ? स्वयंपाकघरातील या नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन पाहाच !

कोमल दामुद्रे

Hair Care Tips : पावसाळ्यात भिजल्यामुळे केस ओले होतात. कधी कधी आपण केस नीट व्यवस्थित सुकवले नाही तर केस चिकट होतात. अशावेळी केस तेलकट देखील होतात. असे का होते तर हवामानातील आर्द्रतेमुळे टाळूमध्ये घाम येतो व केस तेलकट होतात.

परंतु, केसांची योग्य निगा राखायची आहे तर त्याची काळजी देखील गरजेचे आहे. लांब व दाट केस सगळ्यांना हवे असतात त्यासाठी आपण अनेक प्रयत्न देखील करतो. केसांतील चिकटपणा कमी करण्यासाठी व केसांना तेलकट होण्यापासून वाचवण्यासाठी या नैसर्गिक पदार्थांचा वापर करा.

1. लिंबाचा रस

लिंबूमध्ये (Lemon) ऍसिडिक गुणधर्म आढळतात. त्याचा रस आपण केसांना लावू शकतो. यामुळे तेलकट केसांपासून (Hair) तुम्ही मुक्त होऊ शकता. यासाठी एका कपमध्ये लिंबाचा रस काढा. शाम्पूने केस धुवा व नंतर केसांना लिंबाचा रस लावा. यामुळे केसांची पीएच पातळी संतुलित राहिल.

2. अॅपल व्हिनेगर

तेलकट (Oily) केसांपासून सुटका मिळवण्यासाठी टाळूवर अॅपल सायडर व्हिनेगर लावू शकता. ते वापरण्यासाठी, एक कप पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. केस धुतल्यानंतर ते केसांना लावा. त्यामुळे केसांचे अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते. यामुळे केसांचा पीएच कमी होण्यास मदत होते. त्यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळते.

3. कोरफड जेल

कोरफड जेल केसांसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. टाळू खूप कोरडी किंवा खूप तेलकट होण्यापासून रोखते. यासाठी एलोवेरा जेलने केसांना हलक्या हातांनी मसाज करा.

4. बेकिंग सोडा

बेकिंग सोडा टाळूचा पीएच संतुलित करण्यास मदत करू शकतो. याचा वापर करून तुम्ही तेलकट केसांपासून आराम मिळवू शकता. यासाठी एक कप पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि हे मिश्रण तुमच्या ओल्या केसांना लावा, काही वेळाने धुवा. बेकिंग सोडा टाळूचा पीएच संतुलित करण्यास मदत करतो. याचा वापर आठवड्यातून एकदा करु शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT