Monsoon Health Tips Saam TV
लाईफस्टाईल

Monsoon Health Tips : पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहार कसा असावा? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या

Health Tips : पावसाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. पावसाळ्यात योग्य वेळेवर जेवणे आणि झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Ruchika Jadhav

आता सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळा जेवढा आनंद, मौजमजा घेऊन येतो त्यापेक्षा जास्त आजारांना आमंत्रण देतो. अशात पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पावसामुळे सर्वत्र पाणी, घाण साचत असल्याने आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

तज्ञांच्या मते, पावसाळ्यात वात, पित्त, कफ, कावीळ, अपचन, जुलाब यांसारख्या अनेक आजारांचा धोका बळावतो. त्यामुळे पावसाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. पावसाळ्यात योग्य वेळेवर जेवणे आणि झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जेवणामध्ये तमालपत्र, मेथी, कोथिंबीर , काळी मिरी, हिंग , जिरे , धणे, दालचिनी, वेलची, पुदिना, आले , लसूण यांचा समावेश करावा. पावसाळ्यात तृणधान्यांचे सेवन मोठ्या प्रमाणात करावे. तृणधान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. तृणधाण्ये अँटी बॅक्टेरियल गुणांनी समृद्ध असातात. जे शरीराला होणाऱ्या अनेक आजारांपासून तुमचे संरक्षण करते. पावसाळ्यात गहू, मका, ओट्स, तांदूळ तसेच पौष्टिक डाळींचे सेवन करणे आरोग्यास फायदेशीर राहते.

पावसाळ्यात कोणती फळे आणि भाज्या खाव्यात?

नेहमी हंगामी फळांचे आणि भाज्यांचे सेवन करावे. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. फळ आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स आणि इतर पोषक घटक असतात. जे शरीरास तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. पावसाळ्यामध्ये सफरचंद, डाळिंब, अननस, किवी , बेर इत्यादी फळांचे सेवन करावे तर भोपळा, टोमॅटो, शिमला मिरची, इतर हंगामी भाज्यांचे सेवन करावे.

पावसाळ्यात आरोग्याची 'अशी' घ्या काळजी

दिवसा झोपू नये.

रात्री मोकळ्या आकाशाखाली किंवा थंड जमीनीवर झोपू नये.

शरीराला ओलाव्यापासून दूर ठेवावे.

नेहमी पावसाळ्यात कोरड्या जागी राहण्याचा प्रयत्न करावा.

घरात नियमित कापूर,अगरबत्ती जाळावी.

पावसाळ्यात बाहेर न जाता नियमित घरीच योगा, प्राणायाम करावे.

पावसाळ्यात आहार कसा असावा?

आपल्या जेवणा थोड्या प्रमाणात मध मिसळावे.

जेवणामध्ये तेल-तूपाचे प्रमाण जास्त ठेवावे.

रोज मध मिसळून पाणी प्यावे.

पावसाळ्यात नियमित पाणी उकळून प्यावे.

रात्री झोपताना दूधात हळद किंवा तूप टाकून प्यावे.

पावसाळ्यात कोणते पदार्थ खाणे टाळावे?

तेलकट आणि मसालेदार पदार्थ पावसाळ्यात खावू नये.

रात्री गोड आणि आंबट पदार्थांचे सेवन करू नये.

पावसाळ्यात पालेभाज्यांचे जास्त सेवन करणे टाळावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT