Monsoon Season Health Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Monsoon Season Health Tips: पावसाळ्यात ऑफिसला जाताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, आजार राहातील दूर

Tips for Office Goers During Rainy Season: अनेकदा कामाला जायला निघालो की, धो-धो पाऊस बरसतो. त्यामुळे कपडे तर खराब होतातच पण आपली चिडचिड देखील होते.

कोमल दामुद्रे

Monsoon Health Tips : पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू असला तरी तो बहुतांश लोकांना आवडत नाही. अनेकदा कामाला जायला निघालो की, धो-धो पाऊस बरसतो. त्यामुळे कपडे तर खराब होतातच पण आपली चिडचिड देखील होते.

पावसाळा सुरु झाला की, अनेक आजार डोके वर काढतात. ऑफिसला जाताना पाऊस जास्त प्रमाणात आला की, आपण भिजतो व आजारी पडतो. सर्दी-खोकला व तापामुळे आपली ऑफिसला सुट्टी देखील होते व आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु, जर आपण काही गोष्टीची काळजी घेतली तर अनेक आजार आपल्यापासून दूर राहातील.

या गोष्टींची घ्या काळजी

1. कॅफीन पदार्थापासून राहा दूर

पावसाळ्यात (Monsoon) अनेकदा आपण सतत चहा व कॉफीचे सेवन करतो. सतत चहा व कॉफी प्यायल्याने इम्यूनिटी कमकुवत होते. ज्यामुळे मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. त्यासाठी अशावेळी सूप, जिऱ्याचे पाणी किंवा ग्रीन टी फायदेशीर (Benefits) ठरु शकते.

2. स्ट्रीटफूड पासून राहा लांब

बरेचदा आपण पावसाळ्यात रस्त्यावरचे अन्नपदार्थ खातो. ज्यामुळे आपल्या आरोग्याला नुकसान होते. या ऋतूमध्ये बाहेरील अन्नपदार्थ (Food) खाणे टाळावे. तसेच तळलेले किंवा तेलकट पदार्थांचे सेवन करु नये. रोगप्रतिकारशक्ती वाढेल यांसारख्या पदार्थांचे सेवन करा

3. व्यायाम करा

ऑफिसला जाणारे लोक पावसाळ्यात जिमला जाण्यास टाळाटाळ करतात पण असे करणे आरोग्यास हानिकारक ठरते. या ऋतूमध्ये व्यायाम केल्यास प्रतिकारशक्ती मजबूत राहाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT