Thursday remedies for wealth saam tv
लाईफस्टाईल

Guruwar che Upay: घरी पडेल पैशांचा पाऊस, तिजोरीही भरेल; गुरुवारच्या दिवशी हे उपाय करतील मालामाल

Thursday remedies for wealth : हिंदू धर्मशास्त्रानुसार, गुरुवार हा भगवान विष्णू आणि देव गुरु बृहस्पती यांना समर्पित आहे. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास घरात सुख-समृद्धी येते, पैशांची कमतरता भासत नाही आणि धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुले होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मामध्ये गुरुवारचा दिवस हा अतिशय शुभ मानला जातो. हा दिवस भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांना समर्पित असतो. धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस ज्ञान, समृद्धी, सुख-शांती तसंच चांगल्या नातेसंबंधांसाठी महत्त्वाचा मानला जातो. जर तुम्हाला करिअरमध्ये यश, घरात समाधान, मुलांच्या शिक्षणात प्रगती किंवा शत्रूंपासून संरक्षण हवं असेल तर गुरुवारच्या दिवशी हे सोपे उपाय करा.

लक्ष केंद्रित होण्यासाठी मंत्रजप

गुरुवारच्या दिवशी सकाळी आंघोळ करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. शांत मनाने खालील मंत्राचा २१ वेळा जप करा – “ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नमः”

व्यवसायात वाढीसाठी उपाय

जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये चांगली वाढ हवी असेल तर गुरुवारी भगवान विष्णूंना चंदनाचा तिलक लावा. यावेळी चंदनाच्या सुवासिक अगरबत्तीने पूजा करा आणि प्रार्थना करा. यामुळे व्यापारात सकारात्मक बदल दिसून येतात.

शत्रूंपासून संरक्षणासाठी उपाय

जर कोणी तुमच्या विरोधात सतत वाईट गोष्टी करत असेल, तर त्याचं नाव हळदीच्या पाण्यात भिजलेल्या पिवळ्या कापडावर लिहा आणि विष्णू मंदिरात अर्पण करा. हा उपाय नकारात्मकतेपासून रक्षण करू शकतो.

घरातील संबंध चांगले राहण्यासाठी उपाय

गुरुवारी विष्णूला आमरसाचा नैवेद्य द्या आणि तो प्रसाद घरातील ज्येष्ठ मंडळींना द्या. हे उपाय घरातल्या नातेसंबंधांमध्ये गोडवा राहण्यास मदत होते.

नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय

जर तुम्हाला घरातील नकारात्मकता दूर करायची असेल तर हा उपाय फायद्याचा ठरू शकतो. यामध्ये पाच गोमती चक्र घ्या, ते पूजा करताना विष्णूच्या समोर ठेवा. पूजा झाल्यावर हे गोमती चक्र पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या पर्समध्ये किंवा घरात ठेवा. यामुळे नकारात्मक शक्ती दूर राहतात.

आत्मविश्वास वाढवण्यासाठी

एक मोठा भोपळा घ्या, त्यामध्ये काही फळं, अन्नधान्य आणि थोडी रक्कम ठेवा. पूजा करून तो एखाद्या ब्राह्मणाला दान करा. या उपायामुळे चेहऱ्यावर तेज येतं आणि आत्मविश्वासात वाढ होण्यास मदत होते.

करियरमध्ये वृद्धी

जर तुमच्या मुलांचं करियर आणि अभ्यास चांगला होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. यावेळी पिंपळाची तीन पानं घ्या, त्यावर रोळीने “श्री” लिहा आणि ती भगवान विष्णूंना अर्पण करा. यानंतर दही-साखरेचा नैवेद्य दाखवा. हा उपाय मुलांच्या लक्ष आणि स्मरणशक्तीसाठी फायदेशीर असतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT