Budhwar Upay : बुधवारच्या दिवशी गपणतीची पुजा करताय? या वस्तू कधीही अर्पण करू नये

Wednesday Ganesha worship significance : बुधवार हा गणपतीला समर्पित केलेला दिवस मानला जातो, कारण गणपतीला बुद्धीचा देवता आणि विघ्नहर्ता म्हटले जाते. मात्र, काही वस्तू अशा आहेत ज्या गणपती पूजेमध्ये, विशेषतः बुधवारी, अर्पण करणे वर्ज्य मानले जाते.
Budhwar che Upay
Budhwar che Upaysaam tv
Published On

हिंदू धर्मानुसार, बुधवारचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित केलेला आहे. या दिवशी भक्त गणपती बाप्पाची मनोभावे पुजा करतात. यावेळी काही लोकं गणपती बाप्पासाठी उपवासही करतात. जर तुम्ही बुधवारीही गणपतीची पूजा करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. बुधवारी गणपतीला काय अर्पण करू नये ते आज आपण या आर्टिकलमधून जाणून घेऊया.

बुधवारी भगवान गणेशाची पूजा ही संपूर्ण विधीवत केली जाते. मात्र या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी काही नियम आहेत. बाप्पाची पुजा करताना हे नियम पाळणं गरजेचं आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, गणेश पूजेमध्ये काही वस्तू अर्पण करण्यास मनाई आहे. या वस्तू कोणत्या आहेत ते पाहूयात.

तुळस

भगवान शंकराप्रमाणे गणपतीला तुळशी अर्पण केली जात नाही. गणपती बाप्पाच्या भोगात किंवा प्रसादात तुळशीची पानं घातली जात नाहीत कारण भगवान गणेशाने तुळशीला शाप दिला होता. म्हणूनच गणेशाला तुळशी अर्पण केली जात नाही.

चंद्राशी जोडलेल्या गोष्टी

धार्मिक श्रद्धेनुसार, एकदा चंद्रदेवाने भगवान गणेशाची चेष्टा केली होती. या चेष्टेमुळे गणेश रागावले आणि त्यांना शाप दिला. तेव्हापासून चंद्राशी संबंधित वस्तू जसं की पांढरी फुलं, कपडे, पांढरा पवित्र धागा, पांढरा चंदन इत्यादी गणपतीला अर्पण केल्या जात नाहीत.

Budhwar che Upay
Tri Ekadash Yog: शुक्र-बुधाच्या संयोगाने बनणार लाभ-दृष्टि योग; 'या' 3 राशींना लागणार लॉटरी

तुटलेल्या अक्षता

अक्षता म्हणजे जे खराब झालेले नाही म्हणजेच जे अक्षय आहे. बुधवारी गणेशजींच्या पूजेमध्ये तुटलेला अक्षता वापरू नये. असे केल्याने पूजेचं फळ मिळत नाही. गणपती बाप्पाला फक्त अखंड अक्षता अर्पण करावं.

Budhwar che Upay
Mangalwar Che Upay: मंगळवारच्या दिवशी हनुमानचा आशीर्वादाचा मिळवण्यासाठी करा हे उपाय; प्रत्येक कामात मिळेल यश

सुकलेली फुलं

गणपतीच्या पूजेत सुकलेली फुलं आणि माळा यांचा वापर नेहमी टाळावा. बाप्पाच्या पूजेत त्यांचा वापर केल्याने दोष निर्माण होऊ शकतो. पूजास्थळी सुकलेली फुलं किंवा माळा ठेवल्याने देखील वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. म्हणून गणेशाची पूजा करताना हे लक्षात ठेवा.

Budhwar che Upay
Mangalwar Upay: हनुमानजींचा हा एकच मंत्र करेल चमत्कार; मंगळवारच्या दिवशी उपाय केल्याने आयुष्यात येईल सुख

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com