Monday Upay saam tv
लाईफस्टाईल

Somwar che Upay: लवकर लग्न आणि पैसा मिळवण्यासाठी सोमवारी शंकराला प्रसन्न करा, पाहा कोणते उपाय करू शकता

Monday che Upay: सोमवारी घरातील कष्ट दूर करण्यासाठी काही उपाय केले जातात. जर तुम्हाला आयुष्यात कोणत्या तक्रारी किंवा समस्या असतील तर तुम्ही हे उपाय करू शकता. हे उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोमवारचा दिवस हा भगवान शिव यांचा समर्पित असतो. या दिवशी भगवान शंकराची पुजा केली जाते तसंच व्रतही ठेवला जातो. या दिवशी शंकराचे भक्त मंदिरात जाऊन पिंडीवर जल चढवतात. असं मानलं जातं, ज्या व्यक्ती मनोभावे शिवची पुजा करतात त्यांना मनासारखं फळ प्राप्त होतं. भगवान शिव यांच्या पुजा केल्याने लवकर लग्न होणं तसंच घरात शांती राहणं या गोष्टी होतात.

सोमवारी शंकर भगवान यांना प्रसन्न करण्यात उपाय

सोमवारच्या दिवशी शंकराला प्रसन्न करायचं असेल तर त्यांना पांढरं चंदन लावा आणि शिव चालीसा म्हणा. कारण पांढरं चंदन शंकराला प्रिय आहे. असं म्हणतात की, जर तुम्हाला भोलेनाथाला प्रसन्न करायचं असेल तर सोमवारी ब्रम्ह मुहूर्तावर उठून त्यांचा पाण्याने अभिषेक करावा आणि पांढरं चंदन लावून त्यांच्या मंत्राचा जाप करावा.

लग्न होण्यासाठी उपाय

जर कोणाचं लग्न होत नसेल तर सोमवारच्या दिवशी शंकरासोबत पार्वतीचीही पूजा करावी. सोमवारच्या दविशी १०८ बेलपत्र आणि प्रत्येकावर चंदनाने शिव-शंभू लिहून ते एक एक करून शिवलिंगावर चढवावं. याशिवाय सोमवारच्या दिवशी पिवळी वस्त्र परिधान करून शिवलिंगावर जल चढवा. सलग ११ सोमवार केल्याने विवाह योग बनू शकतो.

नोकरीत चांगला प्रभाव

जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर मध चढवा. याशिवाय शिव रक्षा स्त्रोताचं पठण करावं. यामुळे आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळण्यासही मदत होते.

घरात शांती राहण्यासाठी उपाय

सोमवारच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. याशिवाय सोमवारचा संबंध हा चंद्राची असतो. चंद्र शांतीचा प्रतिक मानला जातो. यादिवशी चंद्राचं दर्शन करून त्याची पुजा करा. यावेळी 'ओम चंद्राय नमः' या मंत्राचा जप तुम्ही करू शकता.

मन शांतीसाठी उपाय

जर तुमच्या जीवनात कोणत्याही गोष्टी सुरळीत होत नसतील आणि मन एकाग्र नसेल तर सोमवारच्या दिवशी तुम्ही एक उपाय करू शकता. यासाठी सोमवारी लवकर उठून तुम्ही अंघोळ करू शकता. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून शिवाची पुजा करा. यानंतर तुपाचा दिवा लावून धुवपत्ती लावा. यासोबत ॐ नमः शिवायचा जप करा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

SCROLL FOR NEXT