Wednesday Remedies
Wednesday Remediessaam tv

Budhwar che Upay: घरी येणार पैसा अन् आनंद; बुधवारच्या दिवशी गणपतीची पूजा करताना 'हे' उपाय करा

Wednesday Remedies: बुधवार हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित असल्याचं मानलं जातं. हा दिवस गणपती आणि बुध ग्रहाचा देखील मानला जातो. या दिवशी गणपती बाप्पाला कसं प्रसन्न करावं ते जाणून घेऊया.
Published on

गणपतीला सर्व देवांमध्ये प्रथम पुजलं जातं. असं मानलं जातं की, ते प्रत्येक संकटाला दूर करतात. याशिवाय ते आपल्या भक्तांना धन, समृद्धी, यश तसंच वैभव देतात. बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाची पुजा करणं खूप खास असतं. जर तुम्हाला आयुष्यात पैसा, सन्मान आणि यश हवं असेल तर बुधवारच्या दिवशी हे उपाय नक्की करा.

असं मानलं जातं की, गणपतीचे हे उपाय बुधवारी केल्याने त्यांची कृपा सदैव आपल्यार राहते. त्याचप्रमाणे बुध ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती देखील मिळते. याचं कारण म्हणजे गणपती सर्व ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर करतो.

गणपतीला दुर्वा चढवा

गणपतीला दुर्वा खूप आवडतात. हा एक छोटा पण प्रभावी उपाय मानला जातो. बुधवारी सकाळी अंघोळ करून गणपतीला ११ दुर्वा चढवा. यावेळी ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा ११ वेळा जप करा. यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि सर्व अडकलेली कामं पूर्ण होण्यास मदत होते.

Wednesday Remedies
Gajkesari Rajyog: 12 वर्षांनी बुध ग्रहाच्या राशीत बनवणार पॉवरफुल योग; कन्या, मिथुन, सिंह राशींना कोणता होणार फायदा?

लाडूचा प्रसाद

गणपतीला मोदक आणि लाडू खूप आवडतात. बुधवारी गणपतीला ५ बेसनाच्या लाडूंचा प्रसाद गणपतीला दाखवा. पूजा सुरु करण्यापूर्वी फूल चढवा आणि अगरबत्ती लावा. पुजेनंतर लाडू गरजूंमध्ये वाटा. यामुळे घरातील आर्थिक तंगी दूर होते.

मंदिरात दिवा लावा

बुधवारी संध्याकाळी गणपती मंदिरात तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना गणपतीकडे तुमच्या जीवनात असलेल्या समस्या दूर करण्याची प्रार्थना करा. जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरातील मुर्तीसमोर दिवा लागा.

Wednesday Remedies
Somwar che Upay: समस्या दूर होऊन घरी येणार पैसा; सोमवारच्या दिवशी शंकराच्या आशिर्वादासाठी करा 'हे' उपाय

गणेश चालीसेचं पठण करा

बुधवारी सकाळी किंवा संध्याकाळी गणपतीच्या चालीसेचं पठण करा. हे पठण करण्यापूर्वी गणपतीला फूल, अगरबत्ती आणि एक छोटा प्रसाद चढवा. चालीसेला शांत मनाने आणि पूर्ण लक्ष देऊन वाचा. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर ‘संकट मोचन गणेश स्तोत्र’ चा पाठ करा. हा उपाय तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येला दूर करतो.

Wednesday Remedies
Bada Mangal: आज वर्षातील दुसरा मोठा मंगळ; हनुमानजींना 'या' गोष्टी करा अर्पण, प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com