लहान मुल रडत असेल, एका जागी बसत नसेल तर पालक त्यांना लगेचच मोबाईलमध्ये कार्टून किंवा रिल्स लावून देतात. पालकांना वाटतं मुलं आता शांत बसली आहेत. पण या सवयींमुळे मुलांचा मेंदू विचार करणं थांबवतो. पालक याकडे दुर्लक्ष करतात. असं तज्ज्ञ स्पष्टपणे सांगत आहेत.
मोबाईलच्या या सायलेंट साउंड'चा मुलांच्या मानसिक विकासावर इतका खोल परिणाम होत आहे की डॉक्टरही टेंन्शनमध्ये पाहायला मिळतायेत. जगभरात मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्याची मागणी वाढत आहे. ऑस्ट्रेलियाने तर 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया अकाउंट्सवर थेट बंदी घातली आहे. या चर्चेचे पडसाद भारतातही उमटत असून राजस्थानची राजधानी जयपूर याचं मोठं उदाहरण ठरत आहे.
जयपूरच्या सवाई मानसिंग (SMS) रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिनेश खंडेलवाल सांगतात की आता 3 ते 7 वर्षांच्या लहान मुलांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, अॅंग्झायटी, चिडचिड, भाषा समजण्यात अडचणी आणि सामाजिक वर्तनातील समस्या वाढताना दिसत आहेत.
यामागचं मुख्य कारण म्हणजे मोबाईल स्क्रीनचा अतिरेक. ही तीच वयाची पायरी आहे, जिथे मुलं आजूबाजूच्या गोष्टी ओळखायला, लोकांशी जोडायला आणि प्रतिक्रिया द्यायला शिकतात. मात्र, सतत मोबाईल स्क्रीनसमोर बसल्यामुळे ही नैसर्गिक प्रक्रिया थांबते. परिणामी, मेंदूचा विकास खुंटतो.
काही मुलांना अवघ्या 8-9 महिन्यांच्या वयातच मोबाईलची सवय लागत आहे. आईला वाटतं, मोबाईल दाखवला की बाळ शांत राहील. पण हाच मोबाईल त्याच्या मानसिक विकासाचा मार्ग भरकटवतो.
दिवसभर 2 ते 4 तास कार्टून, रील्स किंवा व्हिडीओ पाहणारी मुलं हळूहळू साधी भाषा शिकण्यात मागे पडतात, इतरांशी संवाद साधू शकत नाहीत आणि सामाजिक उपक्रमांपासून दूर जातात. अशी मुलं जणू एका डिजिटल बबलमध्ये अडकतात आणि वास्तव जगातील भाषा, भावभावना व संकेत समजून घेण्याची क्षमता कमी होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.