Mobile Blast News Saam tv
लाईफस्टाईल

Mobile Blast Reason: मोबाईलचा स्फोट होण्यामागं 'ही' आहेत कारणं, वापर करताना या गोष्टी जरुर लक्षात ठेवा

Why do phone batteries explode: मोबाईल हाताळताना आपण काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या.

Priya More

Smartphone Blast Reasons: मोबाईल (Mobile) हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक झाला आहे. मोबाईलशिवाय आपले कुठलेच काम पूर्ण होत नाही. पण बऱ्याचदा हाच मोबाईल जीवघेणा ठरत असल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. मोबाईलचा स्फोट (Mobile Blast) होऊन अनेकांचा मृत्यू तर काही जण जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

नुकताच केरळमध्ये एका हॉटेलमध्ये चहा पित बसलेल्या आजोबांच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट होतो. पण सुदैवाने या घटनेत आजोबा बचावले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा मोबाईलच्या स्फोटचा मुद्दा पुढे आला आहे. अशामध्ये आज आपण मोबाईलचा स्फोट का होतो? (Mobile Blast Reason) आणि मोबाईल हाताळताना आपण काय काळजी घ्यावी हे जाणून घेणार आहोत...

मोबाईलचा स्फोट होण्यामागची कारणं आणि अशी घ्या काळजी -

ओरिजनल चार्जर -

- मोबाईलचा वापर करताना तुम्ही ओरिजनल चार्जरचाच वापर करा. जर तुम्हाला मोबाईलसोबत मिळालेला चार्जर खराब झाला असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत स्टोअरमधून तो विकत घ्या. कोणताही कमी दर्जाच्या चार्जरचा वापर करु नका.

चार्जिंग जास्त करणं -

मोबाईलला सूर्यप्रकाशात ठेवून कधीच चार्जिंग करु नका. यामुळे मोबाईल जास्त गरम होऊन त्याचा स्फोट होण्याची जास्त शक्यता असते. बऱ्याचदा चार्जिंग पूर्ण होऊन देखील मोबाईल चार्जिंग करत ठेवला तर तो गरम होतो. जर तुमचा मोबाईल वापरत असताना सतत गरम होत असेल तर त्याचा वापर करणं थांबवा. नंतर मोबाईल सामान्य तापमानात आल्यावर त्याचा वापर करा. महत्वाचे म्हणजे मोबाईल चार्जिंग करताना त्याला गरम वातावरणात ठेवू नका.

मोबाईल चार्जिंगला लावून बोलणे -

बऱ्याचदा कामाच्या गडबडीत मोबाईलला चार्जिंग करणं आपण विसरतो. त्यामुळे अनेकदा आपण मोबाईल चार्जिंग करताना कॉलवर बोलतो. पण हे असं करणं खूपच चूकीचे आहे. चार्जिंग करताना मोबाईलचे तापमान हे जास्त असते. त्यामुळे मोबाईल गरम होऊ शकतो. अशामध्ये कॉलवर बोलल्यामुळे मोबाईलवर अधिक दबाव येऊन त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी म्हणून मोबाईल चार्जिंग करताना कॉलवर बोलू नका.

स्वस्त बॅटरी -

बऱ्याचदा मोबाईलची बॅटरी खराब झाल्यावर अनेक जण पैसे वाचवण्यासाठी स्वस्तात किंवा लोकल बॅटरी मोबाईलमध्ये टाकतात. पण पैसे वाचवण्यासाठी असे करणं तुमच्या जीवावर बेतू शकते. स्वस्तातल्या बॅटरीमुळे मोबाईलचा स्फोट होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे ओरिजनल किंवा चांगल्या दर्जाची बॅटरीच खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

गेम खेळताना -

अनेकांना मोबाईलवर गेम खेळायला खूप आवडते. मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वजण मोबाईलवर गेम खेळतात. मोबाईलवर गेम खेळताना तो जास्त तापतो. मोबाईलचे तापमान जास्त वाढत गेले तर त्याच्या बॅटरीचा स्फोट होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे गेम खेळताना सावधान. लहान मुलांना गेम खेळायला देताना देखील विशेष काळजी घ्या.

मोबाईल खरेदी करताना हे लक्षात ठेवा -

मोबाईल खरेदी करताना विशेष काळजी घेणं गरजेचे आहे. सरकारने मोबाईलसाठी बीआयएस मान्यता अनिर्वाय केली आहे. त्यामुळे मोबाईल खरेदी करताना तुम्ही बीआयएस सर्टिफाईड मोबाईलच खरेदी करा. बाजारात स्वस्त मिळाणारे चायनाचे मोबाईल तुम्ही अजिबात खरेदी करु नका. या फोनमधील बॅटरी हलक्या दर्जाच्या असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Liver disease: एड्सपेक्षाही धोकादायक आहे 'हा'लिव्हरचा आजार; 'साइलेंट किलर' समस्येची लक्षणंही वेळीच जाणून घ्या

Fraud Case : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक; शेकडो गुंतवणूकदार अडचणीत

Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT