Home Remedies For Acidity: उन्हाळ्यात मसाल्याचे व तळलेले पदार्थ खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी होते ? हे डिंक प्या, त्वरित मिळेल आराम

How To Reduce Acidity Quickly: तेलाचे व मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला अपचनाचा त्रास होऊ लागतो.
Home Remedies For Acidity
Home Remedies For Acidity Saam Tv

Drinks To Reduce Acid Reflux : उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला सतत तहान लागते. भूक जरी कमी होत असली तरी तेलाचे व मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला अपचनाचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीची समस्या सतावू लागते.

उन्हाळ्यात बाहेरचे पदार्थ खाल्ले की, पोट जड होते व बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. तर काहींना ही अ‍ॅसिडिटीची समस्या रोजच सतावते. बद्धकोष्ठता (constipation) असेल, पोट नीट साफ होत नसेल, अ‍ॅसिडिटी राहिली असेल तर यासाठी अनेक घरगुती उपाय (Home remedies) सांगितले जातात.

जवळपास यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो परंतु, आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची अॅसिडिटी मिनिटांत बरी होईल जाणून घेऊया त्याबद्दल

Home Remedies For Acidity
Acidity Problem : जेवल्यानंतर लगेच छातीत होते जळजळ, मग 'हे' करुन पाहा

1. अ‍ॅसिडिटीसाठी हे ड्रिंक (Drink) प्या

हे सरबत प्यायल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. ते बनवण्यासाठी गुलकंद, डिंक , चिया सीड्स आणि सब्जाच्या बिया वापरल्या जातात. या सर्व गोष्टी आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता दूर करतात.

2. फायदा कसा होतो ?

  • गुलकंद हे शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. आतड्यांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी मदत करते.

  • यामुळे शरीरात चांगले बॅक्टेरिया आणि श्लेष्मा वाढवण्यास मदत होते. त्यामुळे पोट साफ करणे देखील सोपे होते.

  • जर तुमचे पोट सकाळी सहज साफ होत नसेल तर हे ड्रिंक्स तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

  • यामुळे पोटातील आम्लता कमी होते. तसेच अँटी-अ‍ॅसिडिटीमुळे शरीराला झालेले नुकसान दुरुस्त करते.

  • डिंक हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते .

  • चीया सिड्स व सब्जा बीमध्ये पेक्टिनसह अनेक विद्राव्य तंतू असतात. पेक्टिन हे प्रीबायोटिक आहे. हे चयापचय सुधारण्यास आणि आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढविण्यात मदत करते. त्यामुळे अ‍ॅसिडिटीही कमी होते.

Home Remedies For Acidity
High Blood Pressure : मीठाच्या अतिरेकामुळे वाढतो उच्च रक्तदाब त्रास; जडू शकतात अनेक गंभीर समस्या, ही लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध !

3. कसे बनवाल ?

साहित्य

  • २ चमचे सब्जा बिया (भिजवलेले)

  • 2 टीस्पून डिंक(भिजवलेले)

  • 1 टीस्पून गुलकंद

  • 200 मिली दूध

Home Remedies For Acidity
Rupali Bhosale: अगं बाई, हा गुलाब नेमका कुणासाठी ?

पद्धत

हे बनवण्यासाठी थंड दूधात वरील सर्व साहित्य एकत्र मिसळून प्या. अॅसिडिटीसाठी हे ड्रिंक फायदेशीर ठरते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com