Dark underarms saam tv
लाईफस्टाईल

Dark underarms: दह्यामध्ये 'हा' १ पदार्थ मिसळून तयार करा पेस्ट; अवघ्या १० मिनिटांत दूर होईल अंडरआर्म्सचा काळपटपणा

How to Lighten Your Underarms : काळपट अंडरआर्म्समुळे अनेक महिला त्रस्त आहेत. अनेक उपाय करू देखील हा काळपटपणा दूर होत नाही. यासाठी आज आम्ही तुम्हाला एक पेस्ट सांगणार आहोत जी तुमच्या फायद्याची आहे.

Surabhi Jayashree Jagdish

काखेतील काळेपणा अनेकदा चारचौघांमध्ये आपल्याला लज्जास्पद वाटतो. यामुळे स्लिवलेस कपडेही मुली घालत नाही. अंडरआर्म्सचा काळेपणा तुमच्या हातांची सुंदरता काही प्रमाणात कमी करते. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उपाय आणला आहे.

एक खास पेस्ट दूर करेल तुमचा काळेपणा

आज आम्ही तुम्हाला अशा एका पेस्टबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचे काळे अंडरआर्म्स दूर होण्यास मदत होईल. जाणून घेऊया ही पेस्ट नेमकी कशाची आहे आणि तिचा वापर कसा करता येऊ शकतो.

दही आणि हळदीची पेस्ट

अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही दही आणि हळदीच्या पेस्टचा वापर करू शकता. या पेस्टच्या वापराने अवघ्या काही काळात तुमचे काळे अंडरआर्म्स दूर होऊ शकतात. जाणून घेऊया ही पेस्ट कशी तयार करता येईल.

कशी बनवायची ही पेस्ट?

ही पेस्ट तयार करण्यासाठी तुम्हाला हळदीच्या पावडरमध्ये लिंबाचा रस योग्य पद्धतीने मिक्स करायचा आहे. यामध्ये दही घालून थोडी घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या अंडरआर्म्सवर लावा. १० मिनिटं ही पेस्ट तशीच राहू द्या. सुकल्यानंतर कोमट पाण्याच्या सहाय्याने अंडरआर्म्स साफ करून घ्या.

किती वेळा वापर करावा?

अंडरआर्म्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी आठवड्यातून ४-५ वेळा तुम्हाला या पेस्टचा वापर करावा लागेल. काही दिवसांतच तुम्हाला याचा चांगला रिझल्ट दिसून येईल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

SCROLL FOR NEXT