Mishti Doi  Saam TV
लाईफस्टाईल

Mishti Doi : मिष्टी दोई समोर सर्वच मिठाई फिकी; एकदा खाल तर 'या' स्वीट डिशच्या प्रेमात पडला

Mishti Doi Recipe : आम्ही तुम्हाला बंगालमधील एका अनोख्या स्वीट डिशची माहिती सांगणार आहोत. ही स्वीट डिश इतकी जबरदस्त टेस्टी आहे की, एकदा खाल्ल्यावर सतत हिच मिठाई पुन्हा पुन्हा खावी वाटते.

Ruchika Jadhav

आजवर तुम्ही विविध प्रकारच्या मिठाई खाल्ल्या असतील. महाराष्ट्रात देखील विविध पारंपरिक आणि स्वादिष्ट मिठाईचे पदार्थ मिळतात. अशात आज आम्ही तुम्हाला बंगालमधील एका अनोख्या स्वीट डिशची माहिती सांगणार आहोत. ही स्वीट डिश इतकी जबरदस्त टेस्टी आहे की, एकदा खाल्ल्यावर सतत हिच मिठाई पुन्हा पुन्हा खावी वाटते.

आज आपण मिष्टी दोही कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घेणार आहोत. मिष्टी दोही हा दहीमधीलच एक प्रकार आहे. आपण नेहमी खातो ते आंबट दही असतं आणि हे गोड दही आहे. याची रेसिपी फारच सिंपल आणि सहज कुणालाही बनवता येईल अशी आहे.

साहित्य

दही अर्धी वाटी

साखर 4 चमचे

दूध आर्धा लिटर

कृती

फक्त तीन साहित्यात तयार होणारे हे दही बनवण्यासाठी बाहेरून आणलेलं दही वापरू नका. घरी स्वतः बनवलेलं दही वापरा. सुरुवातीला दही एका कॉटनच्या कापडात बांधून घ्या. त्यानंतर या दह्यात असलेलं पाणी गाळून घ्या. दह्यातील पाणी पूर्ण गाळून झाल्यावर घट्ट असं आर्धी वाटी दही आपल्याला लागणार आहे.

हे दही नंतर एका बाउलमध्ये काढून छान फेटून घ्या. दही अगदी सॉफ्ट आणि मऊ झालं पाहिजे असं फेटा. पुढे फुल फॅट असलेलं दूध तापवून घ्या. हे दूध तापल्यावर दुराऱ्या एका भांड्यात साखर टाकून घ्या. साखरेचा साधा पाक करून घ्या. आपल्याला जास्त पाक तयार करायचा नाही. फक्त साखर विरघळली पाहिजे याची काळजी घ्या. त्यानंतर या पाकात दूध मिक्स करा.

दूध मिक्स करत असताना साखरेचे लगेच खडे तयार होतात. तर घाबरु नका. ती साखर दुधात विरघळलेपर्यंत उकळवून घ्या. नंतर गॅस बंद करा आणि दूध नॉर्मल टेंप्रेचरवर येऊ द्या. त्यानंतर या दुधात गेलेलं दही मिक्स करा आणि दही होण्यासाठी ठेवून द्या.

पावसाळा किंवा थंडीचे दिवस आतील तर दही तयार होण्यासाठी त्याला ऊब द्या. त्यासाठी भांड्यावर एक जाड रुमाल टाकून ठेवा. असे केल्याने दही छान घट्ट तायर होतं. तुम्ही रात्री हे दही लावून ठेवू शकता. त्यानंतर सकाळी पाहिल्यावर दही अतीशय घट्ट तयार होतं. अगदी ज्या भांड्यात दही आहे ते भांडे उलट केल्यावर सुद्धा दही खाली पडत नाही इतकी त्याची थिक कंसिस्टन्सी तयार होते. तयार दही तुम्ही १ किंवा आर्धा तास फ्रिजमध्ये देखील ठेवू शकता. थंड मिष्टी दोही खाण्यासाठी आणखीनच स्वादिष्ट लागतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

6,6,6,6,6,6,6,6...षटकारांचं वादळ, 11 चेंडूत ८ षटकार; युवा फलंदाजाचा विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT