Young Creators New Opportunity Saam Tv
लाईफस्टाईल

Young Creators New Opportunity : मेटा-करिष्‍मा कपूरचा तरुण क्रिएटर्सना सल्ला! ऑनलाइन गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'ऑन आयजी यू डिसाईड'चा सहयोग

Retail India News: पालकांना व मुलांना त्‍यांच्‍या स्‍वास्‍थ्‍यासाठी उपलब्‍ध असलेल्‍या सुरक्षितता साधनांचा वापर करण्‍यास आणि मेटाच्‍या व्‍यासपीठांवरील त्‍यांच्‍या अनुभवावर सर्वोत्तम नियंत्रण ठेवण्‍यास प्रेरित करण्‍याचा उद्देश आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Meta And Karishma Kapoor Tie Up : मेटाने आपल्‍या व्‍यासपीठांवर तरूणांच्‍या स्‍वास्‍थ्‍याबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी आज बॉलिवुड अभिनेत्री करिष्‍मा कपूर यांच्‍यासोबत सहयोगाची घोषणा केली.

या सहयोगाचा पालकांना व मुलांना त्‍यांच्‍या स्‍वास्‍थ्‍यासाठी उपलब्‍ध असलेल्‍या सुरक्षितता साधनांचा वापर करण्‍यास आणि मेटाच्‍या व्‍यासपीठांवरील त्‍यांच्‍या अनुभवावर सर्वोत्तम नियंत्रण ठेवण्‍यास प्रेरित करण्‍याचा उद्देश आहे. हा उपक्रम तरूणांना सकारात्‍मक ऑनलाइन अनुभव मिळण्‍यास मदत करण्‍याकरिता मेटाच्‍या सुरू असलेल्‍या प्रयत्‍नांचा भाग आहे.

या उपक्रमाबाबत आपले मत व्‍यक्‍त करत फेसबुक (Facebook) इंडिया (मेटा) च्‍या पब्लिक पॉलिसी, इन्‍स्‍टाग्राम व पॉलिसी प्रोग्राम्‍सच्‍या प्रमुख नताशा जोग म्‍हणाल्‍या, ''आमच्‍या व्यासपीठांवर व्‍यतित केला जाणारा वेळ अर्थपूर्ण व उद्देशपूर्ण असण्‍याची आमची इच्‍छा आहे आणि या उपक्रमाचा हाच उद्देश आहे.

व्‍यक्‍तींना, विशेषत: तरूण वापरकर्त्‍यांना आमच्‍या व्‍यासपीठांवर सुरक्षित वाटेल असा अनुभव देण्‍याचा आणि पालकांना त्‍यांच्‍यासोबत सहयोगाने या अनुभवावर नियंत्रण ठेवण्‍यास मदत करण्‍याचा या उपक्रमाचा (Program) मनसुबा आहे. आम्‍ही या सहयोगासाठी करिष्मा कपूर यांचे आभार व्‍यक्‍त करतो. त्‍या भारतात (India) या संदेशाचा प्रसार करण्यासाठी समर्थन देत आहेत.''

अभिनेत्री करिष्‍मा कपूर म्‍हणाली की, ''मी स्‍वत: आई असल्‍याने माझ्या मुलांनी खुल्‍या मनाने स्‍वत:ला अभिव्‍यक्‍त करावे अशी माझी इच्‍छा आहे. आज पालक व मुले एकत्र सोशल मीडियाचा वापर करत आहेत. पालक सुरक्षित वातावरण निर्माण करण्‍यास मदत करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. या सुरक्षित वातावरणाचया माध्‍यमातून मुले सोशल मीडियाच्‍या फायद्यांचा आनंद घेऊ शकतात. आई म्‍हणून मी माझ्या मुलांच्‍या स्‍वास्थ्‍याची अधिक काळजी घेते. या गरजांना सुरक्षित ऑनलाइन अनुभवाची जोड असणे आवश्‍यक आहे. मला पालकांना त्‍यांच्‍या मुलांना सोशल मीडिया संवादांमध्‍ये प्रभावीपणे समर्थन देण्‍यास मदत करण्‍याकरिता इन्‍स्‍टाग्रामच्‍या यू डिसाईड मोहिमेसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे.''

किड्सस्‍टॉप्रेसच्‍या संस्‍थापक मानसी झवेरी म्‍हणाल्‍या, ''आज पालक व मुले एकत्र सोशल मीडियाचा वापर करत आहेत. पालक सुरक्षित वातावरण निर्माण करण्‍यास मदत करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. या सुरक्षित वातावरणाचया माध्‍यमातून मुले सोशल मीडियाच्‍या फायद्यांचा आनंद घेऊ शकतात. मेटाचा उपक्रम पालकांना या सुरक्षित अनुभवाची खात्री घेण्‍यामध्‍ये अधिक भूमिका बजावण्‍याची संधी देतो. हा उपक्रम स्‍वागतार्ह ऑफरिंग आहे.''

'यू डिसाईड' ही डिजिटल मोहिम आहे. या मोहिमेअंतर्गत @littleglove_aka_shivani, gamer @sharkshe व @manishkharage यासारखे जवळपास १० लोकप्रिय क्रिएटर्स मिलेनियल्‍स व जनरेशन झेड यांच्‍यामध्‍ये सोशल मीडिया सुरक्षितता आणि उपलब्‍ध असलेल्‍या टूल्‍सबाबत जागरूकतेचा प्रसार करतील.

अनेक वापरकर्तै स्‍वत:ला अभिव्‍यक्‍त करण्‍यासाठी, नेटवर्कसाठी, संपर्कात राहण्‍यासाठी आणि महत्त्वाचे लाइव्‍ह अपडेट्स शेअर करण्‍यासाठी मेटाच्‍या व्‍यासपीठांचा वापर करतात. यापैकी बहुतांश वापरकर्ते तरूण व किशोरवयीन आहेत. वापरकर्त्‍यांच्‍या सुरक्षिततेमध्‍ये अधिक वाढ करण्‍यासाठी मेटाने विविध उपक्रम व संसाधनांची घोषणा केली आहे, जे वापरकर्त्‍यांसाठी उपलब्‍ध आहेत.

युथ वेलबिंग एफर्ट्स (Youth Wellbeing efforts) चा भाग म्‍हणून नुकतेच जारी करण्‍यात आलेल्‍या वैशिष्‍ट्यांमध्‍ये क्‍वाइट मोडचा समावेश आहे. हे वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांना अॅपवरील मित्र व फॉलोअर्ससोबत लक्ष केंद्रित करण्‍यास आणि मर्यादा स्‍थापित करण्‍यास मदत करते, ज्‍यामुळे किशोरवयीन वापरकर्त्‍यांना अॅपवर व्‍यतित केलेला वेळ आणि ते पाहणाऱ्या गोष्‍टींवर नियंत्रण ठेवता येते. इन्‍स्‍टाग्रामच्‍या पॅरेण्‍टल सुपरव्हिजन वैशिष्‍ट्यामध्‍ये अधिक अपडेट्स करण्‍यात आले आहेत.

पालक त्‍यांच्‍या मुलांना फॉलो करणारे अकाऊंट्स, तसेच ते फॉलो करणारे अकाऊंट्स पाहू शकतात. मेटाचे 'फॅमिली सेंटर' पालकांना त्‍यांच्‍या किशोरवयीन मुलांच्‍या ऑनलाइन अनुभवाला समर्थन देण्‍यास आवश्‍यक असलेली सर्व संसाधने व टूल्‍स प्रदान करेल. पालकांना व किशोरवयीन मुलांना सुरक्षितपणे व्‍यासपीठ नेव्हिगेट करण्‍याबाबत माहिती मिळवता येते. किशोरवयीन मुलांनी फेसबुकवर २० मिनिटांपेक्षा अधिक वेळ व्‍यतित केल्‍यास त्‍यांना नोटिफिकेशन्‍स पाहायला मिळेल, ज्‍यामुळे त्‍यांना अॅपमधून वेळ काढण्‍यास आणि दैनंदिन वेळ मर्यादा स्‍थापित करण्‍यास प्रेरित केले जाईल.

मेटा तरूणांच्‍या सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देते. मेटाच्‍या व्‍यासपीठाचा वापर करणारे बहुतांश वापरकर्ते किशोरवयीन आहेत. ही बाब लक्षात घेत मेटाने आपल्‍या सर्व व्‍यासपीठांना सुरक्षित गंतव्‍य बनवण्‍याचा प्रयत्‍न केला आहे आणि गेल्‍या तीन वर्षांमध्‍ये तरूणांच्‍या सुरक्षिततेचा मनसुबा असलेले ३० हून अधिक टूल्‍स लाँच केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : निकालापूर्वीच कणकवलीत लागले नितेश राणेंच्या विजयाचे बॅनर

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT