ऑफिसमध्ये कामाच्या ओझ्यामुळे अनेक वेळा आपल्याला मानसिक तणाव जाणवतो. तणावाचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. त्यामुळं आपले शारिरीक तसंच मानसिक आरोग्य (Mental Health Tips) खालावतं. अशा परिस्थितीत हा तणाव कमी कसा करायचा? ते आपण जाणून घेऊ या. (Latest Health Tips)
आजकाल आपल्यातील बरेचजण त्यांच्या कामात इतके व्यस्त आहेत की, त्यांना स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबाला वेळ देता येत नाही. अनेकदा ऑफिसमध्ये कामाच्या दबावामुळे खूप तणाव (Mental Health) आणि थकवा जाणवू लागतो. बऱ्याचवेळा आपण या समस्यांकडे दुर्लक्ष करतो. परंतु यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचण्याची शक्यता असते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वेळेचं व्यवस्थापन
कामाचा तणाव आणि चिंता टाळण्यासाठी वेळ व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. वेळेचं योग्य व्यवस्थापन केल्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या शेड्यूल करण्यात मदत होते. याच्या मदतीने (Health Tips) आपण घर आणि कामाच्या दरम्यानचा वेळ व्यवस्थापित करू शकतो. यासाठी सर्वात महत्त्वाची कामे ओळखून त्यांना अगोदन प्राधान्य द्या. प्रत्येक कामासाठी एक वेळ निश्चित करा.
विश्रांती
विश्रांती म्हणजेच ब्रेक. कामातून ब्रेक घेतल्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटतं. यामुळे शरीरात नवी ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे आपण अधिक प्रभावीपणे कामावर लक्ष देऊ शकतो. त्यामुळे खूप तणाव जाणवल्यास कामातून थोडी विश्रांती (How To Manage Work Pressure) घ्या. ऑफिसमधून सुट्टी घेऊन काही दिवसांसाठी मित्र किंवा कुटुंबासोबत सहलीची योजना करा.
चर्चा आणि मनोरंजन
समस्या कोणतीही असली तरी त्यावर संवाद हा अतिशय प्रभावी उपाय आहे. तणावातून बाहेर पडण्यासाठी कुणाशी तरी संवाद साधा. मनमोकळेपणाने तुमचे विचार किंवा समस्या कोणाशी तरी शेअर (Work Pressure And Stress) करा. असं केल्याने चिंता आणि तणावाची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. कधी कधी सारख्याच नियोजनबद्ध जीवनामुळे तणाव येतो. त्यामुळे स्वत:ला वेळ द्या. सुट्टीच्या दिवशी चित्रपट बघायला जा. स्वत:चं मनोरंजन करण्यासाठी तुम्ही वेब सिरीज देखील पाहू शकता.
आरोग्याची काळजी
जेव्हा आपण निरोगी असतो, तेव्हा आपलं काम व्यवस्थितपणे करू शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घ्या. झोपल्यानंतर आपल्या शरीराचा ताण आणि दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत होते. त्यामुळे रोज ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे. तसंच रोज सकाळी उठून कमीत कमी ५ ते १० मिनिटे ध्यान आणि व्यायाम करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.