Apple कडून मोठा धमाका होणार; नव्या वर्षांत महत्वाची घोषणा करणार

Apple News : अॅपलकडून मोठा धमाका होण्याची शक्यता आहे. नव्या वर्षांत अॅपलकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
apple product
apple Saam tv
Published On
Summary

अॅपल पुढील वर्षी बजेट फ्रेंडली डिव्हाइस लाँच करण्याच्या तयारीत

MacBook, iPhone 17e आणि 12th जन iPadचा समावेश

MacBook मध्ये A18 Pro तर iPhone 17e मध्ये A19 प्रोसेसर मिळण्याची शक्यता

डिव्हाइसेस स्प्रिंग 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता

अॅपल नव्या एन्ट्री लेव्हल प्रोडक्ट्स लाँच करण्याचा तयारीत आहे. अॅपल कंपनी पुढील काही महिन्यात एन्ट्री लेव्हल प्रोडक्ट्सची घोषणा करण्याची शक्यता आहे. या यादीत बजेट फ्रेंडली MacBook याचा समावेश असणार आहे.मॅकबुक प्रोडक्ट हे A-सीरीजच्या प्रोसेसरसोबत मिळते.

apple product
खूशखबर! म्हाडाकडून लवकरच भाडेतत्त्वावरील घरे मिळणार, प्रशासनाने उचललं महत्वाचं पाऊल

iPhone 16e या फोनचा सक्सेसर म्हणजे iPhone 17e पुढील वर्षी लाँच करण्याची शक्यता आहे. सध्या iPhone 16e हा अॅपल कंपनीचा सर्वात स्वस्त फोन आहे.या दोन्ही प्रोडक्ट्सच्या व्यतिरिक्त १२th जनरेशन iPad वर देखील काम सुरु आहे. हा आयपॅड A18 प्रोसेसरसोबत लाँच होईल.

MacRumors रिपोर्टनुसार, अॅपलच्या नव्या एन्ट्री लेव्हल मॉडल्समध्ये iPhone, iPad आणि Mac लाइनअपमध्ये असल्याने ते देखील पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे. iPhone 17e हा फोन कंपनी स्प्रिंग २०२६ साली लाँच करण्याची शक्यता आहे. यासोबत कंपनी 12th जेन iPad आणि MacBook लाँच करण्याची शक्यता आहे.

apple product
Mumbai Police Transfer : मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या, कारण काय?

एन्ट्री लेव्हल मॅकबुकमध्ये A18 Pro प्रोसेसर मिळेल. या प्रोसेसरमध्ये iPhone 16 Pro सीरीजसोबत लाँच करण्यात आला होता. यामध्ये 13-inch डिस्प्ले देखील देण्याची शक्यता आहे. कंपनीचं डिव्हाइस निळा, गुलाबी, चंदेरी आणि पिवळ्या रंगात लाँच करण्याची शक्यता आहे. त्याची किंमत साधरण ६९९ डॉलर (६२ हजार रुपये) ते ८९९ डॉलर (८० हजार रुपये) असण्याची शक्यता आहे. अॅपलचा बजेट मॅकबुक जुन्या डिझाइन आणि डिस्प्ले पार्टचा उपयोग करण्यात येऊ शकतो. यात 8GB RAM आणि एक टाईप - सी पोर्ट देण्यात येऊ शकतो.

apple product
Employment : राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; तब्बल ८००० विद्यार्थ्यांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार, कुणाला होणार थेट फायदा?

दुसरीकडे iPhone 17e मध्ये कंपनी A19 प्रोसेसर देण्याची शक्यता आहे. 18MPचा फ्रंट कॅमेरा आणि अॅपचलचा C1 मॉडम मिळण्याची शक्यता आहे. फोनच्या डिझाइनमध्ये फारसा बदल पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे. तर 12th जेन iPad मध्ये कंपनी A18 प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com