Manasvi Choudhary
हिवाळ्यात निरोगी आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केले जाते. हिवाळ्यात मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ, पोट फुगणे या पोटाच्या समस्या उद्भवतात.
शेपूची भाजी अनेकांना आवडते पण अनेक महिलांना ती नेमकी कशी बनवायची ही रेसिपी माहित नाही. मुगाची डाळ घालून शेपूची भाजी बनवली तर चवीला भारी लागते.
शेपूची भाजी बनवण्यासाठी शेपू, मुगाची डाळ, तेल, मोहरी जिरे, हिंग, लसूण, हिरवी मिरची, हळद आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.
शेपूची भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिले शेपूची भाजी स्वच्छ निवडून ती धुवून घ्यायची आहे. यानंतर शेपूची भाजी बारीक चिरून घ्यायची आहे.
एका बाउलमध्ये मुगाची डाळ साधारणपणे २० ते ३० मिनिटे पाण्यात भिजवा. म्हणजेच मुगाची डाळ भाजीमध्ये चांगली शिजते
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, जिरे याची फोडणी द्या. नंतर यात ठेचलेला लसूण आणि बारीक चिरलेली मिरची घाला.
या संपूर्ण मिश्रणात भिजवलेली मुगाची डाळ घालून परतून घ्यायची आहे. लगेचच चिरलेली शेपू मिक्स करा.
मिश्रणात चवीनुसार मीठ घालून भाजीवर १० ते १५ मिनिटे झाकण ठेवा. भाजी चांगली शिजल्यानंतर सर्व्हसाठी रेडी होईल.