Shruti Vilas Kadam
बहुतांश साबणांमध्ये हार्श केमिकल्स असतात, यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल कमी होते आणि त्वचा अत्यंत कोरडी व खडबडीत होते.
साबणाचा pH जास्त असतो, तर चेहऱ्याचा pH नैसर्गिकरीत्या कमी असतो. साबण वापरल्याने हा समतोल बिघडतो आणि त्वचा संवेदनशील बनते.
त्वचा कोरडी झाल्यावर सेबम जास्त प्रमाणात तयार होते, त्यामुळे ऑइल ब्लॉकेज होऊन मुरुम-पिंपल्स वाढू शकतात.
साबणातील आर्टिफिशियल सुगंध, रंग किंवा रसायनांमुळे चेहऱ्यावर जळजळ, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते.
अतिरिक्त कोरडेपणामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या, फाईन लाईन्स दिसू शकतात आणि स्किन Ageing वेगाने होते.
साबण त्वचेतील नॅचरल मॉइश्चर काढून टाकतो, त्यामुळे त्वचा फाटणे, ताण जाणवणे आणि कडकपणा दिसू लागतो.
रोज साबण वापरल्याने त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते, चेहरा निस्तेज, रफ आणि जीवंतपणा हरवलेला दिसतो.