Shruti Vilas Kadam
‘द फॅमिली मॅन’ सीझन ३ मध्ये श्रीकांत तिवारीची दमदार भूमिका साकारणाऱ्या मनोज बाजपयी यांना सर्वाधिक २०.२५ ते २२.५० कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
या सीझनमध्ये “रुक्मा” या खलनायकाची भूमिका करणाऱ्या जयदीप अहलावतला सुमारे ९ कोटी रुपये मिळाले आहेत.
“मीरा” च्या भूमिकेत दिसणाऱ्या निमरत कौरला या सीझनसाठी अंदाजे ८ ते ९ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे.
श्रीकांत तिवारीची पत्नी “सुचित्रा” ची भूमिका करणाऱ्या प्रियामणीचे मानधन अंदाजे ७ ते ८ कोटी रुपये आहे.
दहशतवादी मास्टरमाइंड मेजर समीरची भूमिका करणाऱ्या दर्शन कुमारचे मानधन ८ ते ९ कोटी रुपये दरम्यान असल्याचे सांगितले जाते.
श्रीकांतचा जिवलग साथीदार जेकेची भूमिका करणाऱ्या शरिब हाश्मीला या सीझनसाठी सुमारे ५ कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
आश्लेषा ठाकूर (धृति तिवारी) २ ते ४ कोटी रुपये आणि वेदांत सिन्हा (अथर्व तिवारी) १ ते २ कोटी रुपये मानधन मिळाले आहे.