Shruti Vilas Kadam
शेंगदाणे नैसर्गिकरीत्या शरीरात उष्णता निर्माण करतात, ज्यामुळे थंडीच्या दिवसांत शरीर गरम राहते.
शेंगदाण्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स इम्युनिटी मजबूत करून सर्दी-खोकला होण्याची शक्यता कमी करतात.
हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई त्वचेला मॉइश्चर देतात, ज्यामुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी पडत नाही.
शेंगदाणे प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचे उत्तम स्रोत असल्याने ते दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवतात.
शेंगदाण्यात फाइबर असल्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
शेंगदाण्यातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स हृदयासाठी चांगले असतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात.
प्रोटीन, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यामुळे हाडे व स्नायू अधिक मजबूत होतात, विशेषतः थंडीत शरीराला अतिरिक्त पोषणाची गरज असते.