Menopause eye health SAAM TV
लाईफस्टाईल

Menopause eye health: मेनोपॉजमध्ये फक्त शरीरच नाही तर डोळ्यांवरही होतो मोठा परिणाम, महिलांनी वेळेत घ्या ही काळजी

Dry eyes menopause: मेनोपॉज दरम्यान हार्मोनल बदलांमुळे डोळे कोरडे होणे, दृष्टी बदल आणि काचबिंदूसारख्या आजारांचा धोका वाढतो. योग्य काळजी, नियमित तपासणी आणि संतुलित आहारामुळे डोळ्यांचं आरोग्य सुरक्षित ठेवता येऊ शकतं.

Surabhi Jayashree Jagdish

मेनोपॉजचा डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे डोळे कोरडे पडणं (ड्राय आय), दृष्टीमध्ये बदल होणं आणि डोळ्यांच्या इतर आजारांचा धोका वाढू शकतो. समस्या गंभीर होण्यापूर्वी योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे. ज्यामुळे देखभाल आणि जागरूकता तुमची दृष्टी सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकते.

एएसजी आय हॉस्पिटलचे ग्रुप चीफ स्ट्रॅटेजी आणि क्लिनिकल ऑफिसर डॉ. हिमांशू शेखर यांनी सांगितलं की, मेनोपॉज दरम्यान 'हॉट फ्लॅशेस' 'मूड स्विंग्स' होतात आणि झोप पण कमी होते, हे आता जवळपास सर्वांनाच माहिती आहे. पण याच काळात शरीरात असा एक गंभीर बदल होतो, ज्याकडे खूप उशीर होईपर्यंत कोणाचेच लक्ष जात नाही. मेनोपॉज दरम्यान शरीरात होणारे हार्मोनल बदल तुमच्या डोळ्यांवरही वाईट परिणाम करू शकतात.

हार्मोन आणि डोळ्यांचा संबंध- हार्मोन, विशेषतः इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन, आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. हे डोळ्यांमधील ओलावा टिकवून ठेवतात, रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा प्रवाह वाढवतात आणि डोळ्यांच्या नाजूक भागांचे संरक्षण करतात. मेनोपॉज दरम्यान या हार्मोन्सची पातळी कमी होऊ लागते, ज्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या सुरू होऊ शकतात.

मेनोपॉज आणि डोळ्यांचा कोरडेपणा

इस्ट्रोजेनचे पातळी घटल्यामुळे डोळे कोरडे पडतात कारण हे हार्मोन डोळ्यातील ओलावा टिकवून ठेवतात. यामुळे डोळ्यांना खाज, कोरडेपणा आणि थकवा जाणवतो. अनेक स्त्रिया याला केवळ वाढत्या वयाचा परिणाम समजून दुर्लक्ष करतात. मात्र, हा निष्काळजीपणा तुमची दृष्टी कमकुवत करू शकतो आणि दैनंदिन आयुष्य कठीण बनवू शकतो.

मेनोपॉज आणि दृष्टीतील बदल

चष्म्याचा नंबर का बदलतो? मेनोपॉज दरम्यान हार्मोन्स बदलामुळे डोळ्याच्या बाहुलीचा आकार बदलू शकतो. परिणामी चष्म्याचा नंबर वारंवार बदलतो. यामुळे जुन्या चष्म्यातून किंवा लेन्समध्ये अंधूक दिसू लागते. तसंच, डोळ्यांतील कोरडेपणामुळे कॉन्टॅक्ट लेन्स टोचू लागतात आणि त्या वापरणे कठीण होते.

मेनोपॉजमुळे डोळ्यांच्या गंभीर समस्यांचा धोका

मेनोपॉज आणि त्यानंतर स्त्रियांमध्ये डोळ्यांच्या काही गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. संशोधनानुसार, इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे 'काचबिंदू' होण्याचा धोका वाढतो. हा आजार डोळ्यांच्या नसांना इजा पोहोचवतो आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास अंधत्वही येऊ शकतं. याशिवाय, 'मॅक्युलर डिजनरेशन' आणि 'मोतीबिंदू' होण्याची शक्यता देखील मेनोपॉजनंतर वाढते.

कोणत्या सवयींमुळे डोळ्यांचा त्रास वाढू शकतो?

मेनोपॉज हे डोळ्यांच्या समस्यांचे एकमेव कारण नसले तरी, आपल्या काही सवयी परिस्थिती अधिक बिघडवू शकतात. उदा. तासनतास कॉम्प्युटर किंवा फोनचा वापर, धूम्रपान, अपुरी झोप आणि चुकीचा आहार यामुळे डोळ्यांचा धोका दुप्पट होतो. तसेच, मेनोपॉज दरम्यान येणारा मानसिक ताण डोळ्यांवर दबाव वाढवतो, ज्यामुळे डोकेदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो.

निरोगी डोळ्यांसाठी काय करणं आवश्यक?

मेनोपॉजच्या काळात महिलांनी डोळ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. दृष्टीमध्ये कोणताही बदल जाणवला नाही, तरीही नियमित डोळे तपासणी करणं महत्त्वाचं आहे. भरपूर पाणी पिणं, 'लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स'चा वापर, उन्हात जाताना गॉगल वापरणं आणि आहारात ओमेगा-३, ल्युटीन व अँटी-ऑक्सिडंट्सचा समावेश करणं फायदेशीर ठरतं.

मेनोपॉज हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आरोग्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये तुमच्या डोळ्यांनाही तितकेच महत्त्व द्या ही छोटीशी जागरूकता येणाऱ्या काळात तुमची दृष्टी आणि आयुष्याची चमक कायम राखण्यास मदत करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT