Mauni Amavasya 2024  Saam Tv
लाईफस्टाईल

Mauni Amavasya 2024 : मौनी अमावास्येनंतर ४ राशींचे भाग्य उजळणार! प्रेमाची आस पूर्ण होणार, नोकरीत उत्तम संधी

कोमल दामुद्रे

Mauni Amavasya 2024 Budh Uday :

ज्योतिषशास्त्रानुसार पौष अमावास्येला मौनी अमावास्या म्हणून ओळखले जाते. याला दर्श अमावास्या असेही म्हणतात. ही अमावास्या अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी स्नान करुन दान केल्याने देखील अधिक फायदा होतो.

यंदा ही अमावास्या ९ फेब्रुवारीला आहे. यादिवशी स्नान,दान आणि धार्मिक कार्यांना अधिक महत्त्व आहे. असे केल्याने पुण्य फळ मिळते आणि पितरांचा आशिर्वादही मिळतो. तसेच ८ फेब्रुवारीला बुध ग्रहांचा राजकुमार मकर राशीत अस्त पावणार आहे.

ज्योतिषशास्त्रात ग्रहांची अस्त आणि उदय स्थिती ही महत्त्वाची मानली जाते. मौनी अमावस्येचा मेष ते मीन १२ राशींच्या (Rashi) जीवनावर परिणाम कसा होईल. बुधाच्या हालचालीतील बदलाचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होईल. जाणून घेऊया मौनी अमावास्येनंतर कोणत्या राशी लकी ठरणार आहे.

1. मेष

ग्रहांच्या संक्रमणामुळे मेष राशीचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहाणार आहे. जमीन आणि वाहनाचे सुख मिळेल. उत्पन्नाच्या (Money) नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ होतील. मित्रांच्या (Friends) मदतीने करिअरमधील समस्या दूर होतील.

2. वृषभ

व्यवसायात लाभ होईल. करिअरमध्ये मोठे यश मिळेल. नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे. पैशांची आवक वाढेल. आरोग्य सुधारेल. कर्जापासून सुटका होईल.

3. कर्क

बुधाच्या अस्तामुळे उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतून पैसा मिळेल. करिअरमध्ये मोठे यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहिल.

4. कन्या

ग्रहांच्या संक्रमणामुळे जीवनात अनेक मोठे बदल होते. प्रगतीच्या नव्या संधी मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होईल. भौतिक सुखसोयी आणि संपत्तीत वाढ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहिल. आनंदी जीवन जगेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT