हिवाळ्यात बदलत्या ऋतूमध्ये आपल्याला अधिक भूक लागते. वातावरणातील गारव्यामुळे आपल्याला अधिक चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात. सतत बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा घरातच काही वेगळे पदार्थ केले तर? वाढत्या वयात मुलांना देखील मधल्या वेळेत भूक लागते. अशावेळी काय बनवायचे हा प्रश्न अनेकांना पडतो.
लहान मुलांना बाहेरचे पदार्थ अधिक खायला आवडतात त्यातील एक पाव. जर तुमच्या घरी पाव येत असेल तर तुम्ही झटपट अशी चविष्ट रेसिपी बनवू शकतात. यामुळे मुलांचे पोट देखील भरलेले राहिल आणि त्यांना आवडेल देखील. घरच्या घरी मसाला पाव कसा बनवायचा पाहूया रेसिपी (Recipes)
1. साहित्य
2. कृती
सर्वप्रथम पावभाजी मसाला, गोडा मसाला, धणे-जिरे पावडर आणि मीठ एकत्र करा.
तव्यावर बटर घालून त्यावर वरील एकत्र केलेला मसाला घाला.
त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण चटणी घालून तव्यावर एकत्र करुन घ्या.
पाव मध्यभागी कापून तव्यावर हे मिश्रण दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्या.
पावाच्या मध्यभागी बटाट्याचा स्लाइस, टोमॅटो स्लाइस, कांद्याच्या स्लाइस ठेवा.
चवीनुसार मीठ आणि चाट मसाला घाला. तयार आहे गरमा गरम चमचमीत झटपट बनणारा मसाला पाव.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.