बदल्या हवामानात मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. वातावरणातील गारव्यामुळे मुलांना सर्दी, खोकला यांचा अधिक त्रास होतो. जर तुम्हाला देखील सर्दी खोकला यापासून आराम मिळवायचा असेल तर आलं लसणाचे सूप ट्राय करा.
1. साहित्य
२ चमचे आले-लसूण बारीक चिरलेले
२ चमचे गाजराचे बारीक तुकडे
२ चमचे हिरवा वाटाणा
२ चमचे मक्याचे दाणे
२-३ चमचे बारीक चिरलेला कोबी
१ चमचा तेल (Oil)
चवीपुरते मीठ
१ चमचा कॉर्न फ्लॉवर
१ चमचा ठेचलेला लसूण
2. कृती
सूप बनवण्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये तेल गरम करुन घ्या. नंतर त्यात आलं आणि लसूण टाका.
नंतर त्यात गाजर, वाटाणा, मक्याचे दाणे, कोबी टाका.
त्यात पाणी आणि मीठ घाला आणि वरुन ठेचलेला लसूण टाका.
हे मिश्रण भाज्या शिजेपर्यंत चांगले उकळून घ्या.
त्यात कॉर्न फ्लॉवर टाका आणि गरमा गरम सर्व्ह करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.