Chanakya Niti saam tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti: वैवाहिक जीवन क्षणार्धात होईल उद्ध्वस्त; बायकोने 'या' 3 गोष्टी नवऱ्यापासून नेहमी लपवूनच ठेवाव्यात

Secrets to a happy married life: अनेकदा, वैवाहिक जीवनात काही गोष्टी गुपित ठेवणे आवश्यक असते, जेणेकरून नाते अधिक मजबूत राहते. चाणक्यांच्या मते, काही गोष्टी अशा आहेत, ज्या पत्नीने पतीपासून नेहमी लपवून ठेवल्या पाहिजेत

Surabhi Jayashree Jagdish

पती आणि पत्नी हे एकमेकांच्या आयुष्यातील पूरक मानले जातात. परस्परांवरील विश्वास आणि समजूत यामुळे वैवाहिक आयुष्य अधिक मजबूत होतं. पण चाणक्यनीतीमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या पत्नीने कधीही पतीसमोर उघड करू नयेत. या गोष्टी बोलून दाखवल्यास वैवाहिक जीवनात तणाव, वाद आणि अनावश्यक कलह निर्माण होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया त्या ३ गोष्टी ज्या पत्नीने पतीपासूनही गुप्त ठेवल्या पाहिजेत.

कोणत्या गोष्टी पतीपासून गुप्त ठेवाव्यात?

माहेर आणि सासरच्या गोष्टी

आचार्य चाणक्यांच्या मते, लग्नानंतर स्त्रीने माहेरची रहस्यं किंवा सासरच्या उणिवा पतीला कधीही सांगू नयेत. यामुळे दोन्ही घरांमध्ये गैरसमज आणि भांडणं होऊ शकतात. अशा गोष्टींमुळे पती-पत्नीच्या नात्यावरही नकारात्मक परिणाम होतो.

दान आणि पुण्याचा बडेजाव

चाणक्यनीतीत सांगितलं आहे की, दान तेव्हाच फलदायी ठरतं ज्यावेळी ते गुप्त ठेवलं जातं. जर एखाद्या स्त्रीने दान केलं, तर त्याचा गाजावाजा पतीसमोर किंवा इतर कुणासमोर करू नये. शास्त्रानुसार, दानाचं खरं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा ते गुप्त रहातं.

बचत आणि आर्थिक सुरक्षितता

चाणक्य सांगतात की, पत्नीने घरखर्चातून थोडीफार रक्कम बचतीसाठी वेगळी ठेवली पाहिजे. ही रक्कम कठीण काळात उपयोगी पडते. मात्र या बचतीबाबत पतीलाही माहिती देऊ नये, कारण गुप्त ठेवलेले पैसे गरज पडल्यास अधिक सुरक्षित राहतात.

वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी उपाय

तुलना करणं टाळा

पत्नीने आपल्या पतीची तुलना इतर कुठल्याही पुरुषाशी करू नये. ही गोष्ट पतीला आवडणार नाही आणि नात्यात तणाव येऊ शकतो. हेच नियम पत्नीसाठीही लागू आहेत.

विनम्रतेने वागा

चाणक्यांच्या मते, पती-पत्नीने नेहमी एकमेकांशी विनम्रतेने वागलं पाहिजे. नम्र स्वभावामुळे राग आणि मतभेद कमी होतात व नातं अधिक घट्ट होतं.

रागावर नियंत्रण ठेवा

रागाच्या भरात माणूस बरोबर-चूक याचा विचार करत नाही. त्यामुळे पती-पत्नीने आपला राग आटोक्यात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे वैवाहिक जीवन अधिक गोड आणि यशस्वी होतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 11 हजार दिव्यांनी लखलखला अंबड येथील मत्स्योदरी देवीचा परिसर,दीपोत्सवासाठी परदेशी पाहुण्याची हजेरी

J J Hospital Mumbai: डॉक्टर महिलेला अपमानास्पद वागणूक; राज्य महिला आयोगाची सर जे जे समूह रुग्णालयावर कारवाई

नाद करा, पण 'बिजल्या'चा कुठं! शेतकऱ्यानं ११ लाखांना बैल विकला; घोड्यालाही घाम फोडणाऱ्या बिजल्याचा खुराक जाणून थक्क व्हाल

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव काय होतं?

Virat Kohli: विराट कोहलीकडे असलेल्या 'या' ७ महागड्या गोष्टी; किंमत ऐकून व्हाल हैराण

SCROLL FOR NEXT