मार्गशीर्ष महिना म्हणजे स्रियांसाठीचा श्रावण महिनाच असतो. गुरुवारची पुजा, देवीचा घट बसवणं, स्वत: तयार होणे, स्वयंपाक करणे या सगळ्या गोष्टी महिलांना कराव्या लागतात. त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे नैवेद्य तयार करणे. त्याचसोबत गोडाचा प्रसाद तयार करणे हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा असतो. याचाच विचार करून आम्ही तुमच्यासाठी झटपट तयार होणारा दाणेदार असा मुगडाळीचा हलवा ही रेसिपी आणली आहे.
मुगडाळीचा हलवा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे:
1 वाटी मूग डाळ
3 वाटी दूध(गरम दूध)
1 वाटी साखर
1 टीस्पून वेलची पूड
ड्राय फ्रूट्स आवडीनुसार
4 टे स्पून तूप
2-3 केसर काड्या
1 टीस्पून खाण्याचा पिवळा रंग किंवा हळद
मुगडाळीचा हलवा बनवण्याची कृती
सर्वप्रथम तुम्ही केसर एका वाटीत दुधात भिजत ठेवा. आता एका नॉनस्टीकच्या कढईत मुगडाळ व्यवस्थीत भाजून घ्या. डाळीचा रंग बदलला की, डाळ मिक्सरमध्ये एकदम बारिक करून घ्या. आता एका पॅन मध्ये २ चमचे तुप गरम करा. तेल छान तापलं की, तुम्ही त्यात डाळीचे बारिक मिश्रण एकजीव करून घ्या. डाळ एकदम मऊ पीठासारखी केल्याने जास्त तुम्हा परतायला जास्त वेळ लागणार नाही.
आता तुम्ही त्यात आणखी २ चमचे तूप मिक्स करून घ्या. पुन्हा ते परता आणि त्यात दुध अॅड करा. दुध थोडे थोडे अॅड करा. त्याने मिश्रण घट्ट होणार नाही. आता सैल सर मिश्रण झालं की, त्यात ड्राय फ्रूट्स, वेलची पूड, हळद, साखर आणि केसर मिसळून व्यवस्थित परतून घ्या. त्यांनतर दोन मिनिटे त्यावर झाकण ठेवा. चला तयार झाला तुमचा मार्गशीर्ष स्पेशल दाणेदार हलवा.
Written By: Sakshi Jadhav