Margashirsha Pahila Guruvar 2023 : How To Do Mahalaxmi Vrat Know in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Margashirsha Guruvar 2023: मार्गशीर्षातील पहिला गुरुवार कधी? महालक्ष्मीचे व्रत कसे करतात?

Margashirsha Pahila Guruvar 2023 | Mahalaxmi Vrat Information: मार्गशीर्ष हा हिंदूंसाठी पवित्र महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक घरात महालक्ष्मी व्रत पाळले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हे व्रत केले जाते.

Shraddha Thik

Mahalakshmi Pahila Guruvar Vrat 2023 :

मार्गशीर्ष हा हिंदूंसाठी पवित्र महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक घरात महालक्ष्मी व्रत पाळले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हे व्रत केले जाते. यानिमित्ताने अनेक घरांमध्ये श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातही मांसाहार केला जात नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे या वर्षी हा मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार आणि किती दिवस चालणार? त्याबद्दल जाणून घेऊयात. या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्या गुरुवारी महालक्ष्मी व्रत (Vart) पाळण्यात येणार आहे, याचीही माहिती जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला घट सजवणे आणि त्याची पूजेनुसार इतर तयारी करणे सोपे जाईल.

पहिला गुरुवार कधी?

महाराष्ट्रात यंदा पहिला गुरुवार 14 डिसेंबरला आहे. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.24 वाजता अमावस्या (Amavasya) संमाप्तीची वेळ 13 डिसेंबर पहाटे 5.01 वाजता संपेल. नंतर मार्गशीर्ष पहिला गुरुवार असेल. यावेळी व्रत पाळण्यात येणार आहे.

  • पहिला गुरुवार - 14 डिसेंबर

  • दुसरा गुरुवार - 21 डिसेंबर

  • तिसरा गुरुवार - 28 डिसेंबर

  • चौथा गुरुवार - 4 जानेवारी

महालक्ष्मीचे व्रत कसे करतात? (How to Fast For Mahalakshmi Vrat?)

मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरुपात घटस्थापना करण्याची परंपरा आहे. महालक्ष्मीच्या रूपाने घट बसवला जातो. दर गुरुवारी हार व वेणी (गजरा) अर्पण करून पूजा केली जाते.

महिला सकाळ संध्याकाळ घटपूजा करून दिवसभर उपवास करतात. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महिलांसाठी हळदी कुमकुम कार्यक्रम आयोजित केला जातो. यानिमित्ताने सवाष्ण महिलांना त्यांच्या घरी बोलावून हळदी कुंकू आणि वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू दिल्या जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT