कोमल दामुद्रे
हिवाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते.
या काळात अंग दुःखी, सर्दी, खोकला आणि ताप अशा समस्या होतात.
त्यामुळे शरीरात ऊर्जा कायम ठेवणे गरजेचे असते. यासाठी काही पदार्थांचे सेवन करणे फायद्याचे ठरू शकते.
शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आपण आहारात काही पदार्थांचा समावेश करायला हवा.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीच्या भाकरीचे सेवन करावे. ही भाकरी खाल्याने लोह, फायबर आणि पोटॅशियम मिळते.
थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही ज्वारीची भाकरी देखील खाऊ शकता. या भाकरीचे सेवन केल्याने ऊर्जा मिळते
तुम्ही मका उकडवून, भाजून देखील खाऊ शकता. यामध्ये क आणि अ अशी दोन जीवनसत्त्व आहेत.
कुट्टुची भाकरी उपवासाला खाल्ली जाते. अनेक महिला उपवासासाठी ही भाकरी खातात. याच्या सेवनाने आरोग्याला अधिक फायदे होतात.