Drinking Water Saam Tv
लाईफस्टाईल

Kidney Disease: क्षारयुक्त पाणी प्यायल्याने होताहेत गंभीर आजार; डॉक्टरांच्या निरीक्षणातून धक्कादायक खुलासा

Side effects Of Bad Waters : विहिरी आणि बोअरमधील पाण्याने तळ गाठल्याने क्षारयुक्त पाणी नागरिक पित असल्याने किडनी स्टोन आणि किडनी संबंधीचे आजार नागरिकांना जडत आहेत.

कोमल दामुद्रे

Kidney Fail Disease :

दुष्काळी मराठवाड्यामध्ये पाणी प्याल तर होईल किडनी फेल ? अशीच जणू काही परिस्थिती मराठवाड्यातील जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. विहिरी आणि बोअरमधील पाण्याने तळ गाठल्याने क्षारयुक्त पाणी नागरिक पित असल्याने किडनी स्टोन आणि किडनी संबंधीचे आजार नागरिकांना जडत आहेत. तर अनेकांना किडनी फेल सारख्या देखील आजाराचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वी किडनी संबंधी हॉस्पिटलमध्ये येणारी रुग्ण संख्या आणि आताच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पाहुयात यावरील साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट....

दुष्काळजन्य परिस्थितीचे दुहेरी संकट आता मराठवाड्यातील नागरिकांवर असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. एकीकडे दुष्काळ असल्याने पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. तर आता यामध्ये भर म्हणून या मराठवाड्यातील पाणी (Water) पिलं तर थेट किडनीवरचं (Kidney) परिणाम होत असल्याचं धक्कादायक वास्तव डॉक्टरच्या निरीक्षणातून समोर आले आहे.

या पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार आढळत असल्याने या क्षारमुळे पाणी पिणाऱ्या व्यक्तीच्या किडनीवर थेट परिणाम होत आहे. पोटदुखी, किडनी स्टोन, किडनी विषयी आजार (Disease) एवढेच नाही तर किडनी फेलसारख्या आजाराचा सामना करावा लागतो आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वी असणाऱ्या रुग्णसंख्येत आणि डिसेंबर महिन्यातील रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. असं धक्कादायक वास्तव मूत्रविकार तज्ञ असणाऱ्या डॉक्टरच्या निरीक्षणातून समोर आलं आहे..

तर याविषयी किडनी विकार व किडनी प्रत्यारोपण तज्ञ अजित घोडके म्हणाले, की दुष्काळामुळे जमिनीतील पाण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. आणि यामुळे क्षारयुक्त पाणी लोक पीत आहेत. त्यामुळे किडनी स्टोन सारख्या आजाराचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विशेष एका डिसेंबर महिन्यात जवळपास 30 ते 40 रुग्ण पोटदुखीमुळे हॉस्पिटलमध्ये आले आहेत.

त्यांना सोनोग्राफीमध्ये किडनी स्टोन झाल्याचे सांगितले गेले तर यापैकी 10 ते 15 किडनी स्टोन झालेल्या रुग्णांवर आम्ही शस्त्रक्रिया देखील केलेली आहे.आणि याच किडनी स्टोन मुळे किडनी फेलिवर होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अवघ्या एका डिसेंबर महिन्यात 5 ते 6 रुग्णांचे किडनी स्टोन मुळे डायलिसिस करण्याची वेळ देखील आली. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यापूर्वी येणाऱ्या रुग्णात आणि आता येणाऱ्या रुग्णांमध्ये दुप्पट प्रमाणात वाढ झाली आहे. असं निरीक्षण किडनी विकार व किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर अजित घोडके यांनी व्यक्त केलं

किडनी बाबतचे आजार होऊ नये, यासाठी नागरिकांनी पाणी फिल्टर करून किंवा पाणी उकळून थंड करून किंवा तुरटीचा उपयोग करून पाणी स्वच्छ करून प्यावं आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी प्यावे. ज्याने करून किडनी विषयी आजार होणार नाहीत. असं आवाहन देखील डॉ. अजित घोडके यांनी केल आहे.

दरम्यान दुष्काळी मराठवाड्यातील नागरिक अगोदरच पाणी संकटाचा सामना करत असताना आता त्यांच्यापुढे हे नवसंकट उभा ठाकल्याने, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी कमी प्यायलं तरीही किडनी स्टोनचा धोका आणि पाणी जास्त प्यायलं तरीही किडनी स्टोनचा धोका अशी जणूकाही परिस्थिती मराठवाड्यात पाहायला मिळतेय. त्यामुळे आता नागरिकांनी स्वतःहून काळजी घेण्याची गरज निर्माण झाली असून यावर आता शासन आणि प्रशासन उपाययोजना करणार का ? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT