Headache Problem : हँगओव्हरमुळे डोकेदुखी वाढलीये? हे घरगुती उपाय करुन पाहाच

Home Remedies for Hangover : डोकेदुखी, मळमळ, सतत तहान लागणे, चक्कर येणे यांसारख्या समस्या उद्भवतात ज्याला हँगओव्हर म्हणतात. हँगओव्हरमध्ये आपला आपल्या शरीरावर नियंत्रण राहात नाही.
Headache Problem
Headache ProblemSaam Tv
Published On

Hangover Issue :

थर्टी फस्टच्या पार्टीनंतर अनेकांचा हँगओवर काही लवकर उतरत नाही. अतिमद्यपानामुळे लोकांना दुसऱ्या दिवशी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. डोकेदुखी, मळमळ, सतत तहान लागणे, चक्कर येणे यांसारख्या समस्या उद्भवतात ज्याला हँगओव्हर म्हणतात.

हँगओव्हरमध्ये आपला आपल्या शरीरावर नियंत्रण राहात नाही. जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी जास्त अल्कोहोलचे सेवन करतात किंवा पाण्याचा (Water) वापर न करता तेव्हा हँगओव्हर जास्त होतो. हँगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपायाचा (Home Remedies) वापर करुन पाहू शकता.

1. लिंबू

आंबट पदार्थांचे सेवन केल्याने हँगओव्हरपासून आराम मिळतो. लिंबूमध्ये सायट्रिक बरोबरच अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे हँगओव्हर कमी होण्यास मदत होते. तसेच तुमच्या शरीरात ऊर्जा भरते. यासाठी थंड पाण्यात लिंबू घालून प्यावे.

Headache Problem
Yoga For Belly Fat: डबल चिन आणि सुटलेल्या पोटामुळे त्रस्त आहात? नियमित करा हा योगा, महिन्याभरात दिसेल फरक

2. नारळ पाणी

नारळ पाणी आरोग्यासाठी (Health) खूप फायेदशीर आहे. पण याचे सेवन केल्याने तुम्ही हँगओव्हरपासून सुटका मिळवू शकता. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या.

3. पुदिना

पुदिन्यात असे अनेक गुणधर्म आहेत की ते पोटातील गॅस काढून टाकते तसेच हँगओव्हरपासून सुटका मिळते. यासाठी ग्लासभर पाण्यात ४-५ पुदिन्याची पाने घालू त्याचे सेवन केल्यास आराम मिळतो.

Headache Problem
ओल्या केस विंचारायचे का नसतात? जाणून घ्या Interesting Facts

4. चॉकलेट

चॉकलेटचे सेवन केल्याने शरीरावर होणारा परिणाम कमी होतो. याशिवाय यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हँगओव्हरपासून सहज सुटका मिळवू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com