मे महिना संपत आला असून लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळा सुरु झाल्यावर सर्वत्र निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळणार आहे. पावसाळा म्हटल्यावर धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पावसाळ्यात डोंगर, दऱ्यातून धबधबे वाहतात. वीकेंडला मुंबईतील जवळपास सर्व धबधब्यांवर खूप गर्दी असते. त्यामुळे तुम्ही मुंबईपासून जवळच असणाऱ्या अनेक धबधब्यांवर भेट देऊ शकतात.
मुंबई आणि पुणेकरांसाठी काही अंतरावर असलेल्या धबधब्यांना तुम्ही भेट देऊ शकतात. पुणे जिल्ह्याला निसर्गाचे सौंदर्य लाभलेले आहेत. तेथील सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील धबधबे पाहणे, त्याचा आनंद घेणे हे नयनरम्य सुख असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला मुंबई पुण्यापासून २-३ तास अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील धबधब्यांची माहिती देणार आहोत.
कल्याण- मुरबाडच्या पुढे गेल्यावर माळशेज घाट येतो. माळशेज घाट हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. माळशेज घाटात हिरवीगार झाडी, धबधबे पाहायला मिळतात. माळशेज घाटात अनेक ठिकाणी पर्यटकांसाठी वेगवेगळे स्पॉट तयार करण्यात आले आहे. तेथे उभे राहून पर्यटक निसर्ग पाहू शकतात.
नाणेघाट
मुंबईपासून १२० किमी अंतरावर असलेला नाणेघाट उलटा वाहणाऱ्या धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे. या घाटात दऱ्यांमधून धबधबा खाली पडतो. त्यानंतर हे पाणी हवेच्या दाबामुळे पुन्हा वरती उडते. त्यामुळेच घाटातील धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.
दाऱ्या घाट
दाऱ्या घाट म्हणजे पांढराशुभ्र फेसाळणारा धबधबा. दाऱ्या घाटातील झाडी, धुके धबधबे पाहणे म्हणजे नयनरम्य सुख असते. पावसाळ्यात या घाटात नक्की भेट द्या.
धुरनळी धबधबा
ओतुरजवळील धुरनळी धबधबा खूप प्रसिद्ध आहे. येथे उंच खडकावरुन धबधबा कोसळतो. येथील निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी असते. येथे पोहचण्यासाठी मुंबईपासून ३-४ तास लागतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.