Pohe Kurdai Recipe : पोह्यांपासून फक्त एका दिवसात बनवा कुरडई; वाचा सिंपली रेसिपी

Pohe Kurdai Recipe in Marathi : कुरडई बनवण्याची रेसिपी फार कठीण आहे. यामध्ये फार वेळ जातो शिवाय मेहनतही फार होते. त्यामुळे आज सिंपल आणि सहज घरच्याघरी बनेल अशी पोह्यांपासून बनणारी कुरडईची रेसिपी जाणून घेऊ.
Pohe Kurdai Recipe in Marathi
Pohe Kurdai RecipeSaam TV

कुरकुरीत कुरडई सर्वांनाच आवडते. हा एक मराठमोळा पदार्थ आहे. सणासुदीच्या दिवशी किंवा पुरणपोळीचा बेत असेल तेव्हा घराघरात हमखास कुरडई बनवली जाते. मात्र कुरडई बनवण्याची रेसिपी फार कठीण आहे. यामध्ये फार वेळ जातो शिवाय मेहनतही फार होते. त्यामुळे आज सिंपल आणि सहज घरच्याघरी बनेल अशी पोह्यांपासून बनणारी कुरडईची रेसिपी जाणून घेऊ.

Pohe Kurdai Recipe in Marathi
Food for Diabeties : मधुमेहाचे रुग्ण करु शकतात 'या' गोड पदार्थांच सेवन

साहित्य

पोहे

जीरे

मीठ

कृती

पोह्यांच्या कुरडईची ही रेसिपी फार सिंपल आहे. यासाठी आधी एका भांड्यात साधे पोहे घ्या. ते १५ ते २० मिनिटे पाण्यात भिजण्यासाठी ठेवा. त्यानंतर यामध्ये जिरेपूड अॅड करा. तसेच चविनुसार मीठ मिक्स करा. मग काय पुढच्या कामाला सुरुवात.

कुरडईच्या साचामध्ये झटपट कुरडई टाकून घ्या. ही कुरडई एखाद्या प्लास्टीकच्या कागदावरच टाका. त्यानंतर कुरडई चांगली उन्हात वाळवून घ्या. फक्त एका दिवसात ही कुरडई छान वाळते. अगदी रात्रीच्या जेवणाला कुरडई हवी असेल तर तेव्हा देखील तुम्ही एका दिवसात ही कुरडई बनवू शकता.

कुरडई आणखी छान आणि लहान मुलांना आवडावी यासाठी बनवताना यामध्ये तुम्ही हिरवा, लाल, पिवळा असे खाण्याचे रंगा मिक्स करू शकता. बाजारात खाण्याचे रंग सहज उपलब्ध होतात. रंगिबेरंगी कुरडया लहान मुलांना फार आवडतात.

कुरडई तळताना ही काळजी घ्या

कुरडई पूर्ण तळली गेल्यावरच ती छान कुरकुरीत लागते. त्यामुळे कुरडई तळताना जास्त तेल तापवण्यासाठी ठेवा. तेल छान तापल्यानंतरच त्यात कुरडई टाका. कमी तापलेल्या तेलात कुरडई छान फुलत नाही. तळताना ही सिंपल ट्रीक कायम लक्षात ठेवा.

गव्हापासून बनणारी कुरडई थोडी कठीण असते. त्यासाठी ३ दिवस गहू भिजत ठेवावे लागतात. नंतर वाटण केल्यावर त्याचा चिक बनवताना तो गरम असतानाच घाटावा लागतो. एवढी मेहनत करण्यापेक्षा सिंपल अशी पोह्यांची कुरडई एकदा नक्की ट्राय करा.

Pohe Kurdai Recipe in Marathi
Stress Controlling Foods: आहारात 'या' पदार्थांचे सेवन केल्यास तुमचा Stress होईल कमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com