Mangal Gochar 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Mangal Gochar 2023 : सिंह राशीत मंगळ ग्रहाचे संक्रमण ! या 4 राशींच्या नशीबाचे टाळे उघडणार, देवी लक्ष्मीची होईल अपार कृपा

Mangal in Kundali : ज्योतिष्यशास्त्रानुसार मंगळ ग्रह हा अधिक त्रासदायक मानला जातो.

कोमल दामुद्रे

Mangal Sinh Rashit Pravesh : ज्योतिष्यशास्त्रानुसार मंगळ ग्रह हा अधिक त्रासदायक मानला जातो. या ग्रहामुळे अनेकांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण होतात. परंतु, काही वेळेस यांच्या शुभ स्थितीमुळे हा लाभदायक देखील ठरतो. याला ग्रहांचा सेनापती म्हणूनही ओळखले जाते.

मंगळ सध्या कर्क राशीत विराजमान आहे. त्यानंतर ७ जुलैला तो आपली दिशा बदलून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या संक्रमणामुळे १२ राशींच्या जीवनावर परिणाम होईल. त्याचा हा प्रभाव शुभ किंवा अशुभ असू शकतो तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, 7 जुलै रोजी होणारे मंगळाचे संक्रमण काही राशींसाठी खूप चांगले परिणाम देईल. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. वृषभ-

वृषभ राशीच्या लोकांना हा मंगळ खूप लाभ देईल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यात यशस्वी (Success) व्हाल, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून योजना करत होती. जीवन अधिक सुखकर होईल. अचानक भरपूर पैसे (Money) मिळाल्याने तुमच्या आर्थिक स्थितीत तेजी येईल.

2. सिंह -

मंगळ संक्रमणानंतर सिंह राशीत प्रवेश करेल त्यामुळे शुभ परिणाम मिळतील. उत्साही आणि निरोगी (Healthy) वाटेल. हाती घेतलेले काम पूर्ण कराल. भाग्य तुमच्या सोबत राहील. जमीन, वास्तू आणि धनाच्या बाबतीत लाभ होऊ शकतो. अचानक आलेल्या पैशामुळे तुमची बचत वाढेल.

3. वृश्चिक -

मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभ देऊ शकते. प्रगती होईल सोबतच पैसाही मिळू शकतो. बेरोजगारांना नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. व्यवसायात लाभ होऊ शकतो. तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात.

4. धनु

धनु राशीच्या लोकांना याचा खूप लाभ होईल. भाग्य तुमच्या सोबत राहील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे अचानक मार्गी लागतील. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. घरामध्ये कोणताही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP vs Congress:'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका'; भाजप प्रदेशाध्यक्षांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार, कोणता बनणार नवा जिल्हा? सुनिल तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण

Konkan Alphonso Mango GI Tag Row: कोकणचा हापूस चोरण्याचा गुजरातचा डाव; 'हापूस'च्या जीआय मानांकनावरून वाद पेटला

'12 लाखांपर्यंतचा टॅक्स माफ केला, तुम्ही पगार वाढवला का?' पंतप्रधानांकडून उद्योगपतींची कानउघडणी

Saturday Horoscope: शनिवारी ग्रहांची मोठी कृपा! या राशींना मिळणार मेहनतीचे फळ, तर काहींना घ्यावी लागणार काळजी

SCROLL FOR NEXT