Mangal Kark Rashit Pravesh : ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ग्रह अधिक कष्टदायक मानला जातो. या ग्रहामुळे अनेकांचे वैवाहिक आयुष्य उद्धवस्त होते तर काहींना हा अति लाभदायक देखील ठरतो. ग्रहांचा सेनापती म्हणून मंगळ या ग्रहाला ओळखले जाते.
मंगळ या ग्रहाने कर्क राशीत (Zodiac) प्रवेश केला. मंगळ 1 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंतच कर्क राशीत प्रवेश करेल, त्यानंतर तो सिंह राशीत जाईल. कर्क राशीतील मंगळाच्या संक्रमणाचा सर्व 12 राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल. या लोकांच्या आयुष्यात मोठे चढ-उतार पाहायला मिळतील. तर काही राशींसाठी हा शुभ संकेत देईल. या लोकांना भरपूर पैसा (Money) आणि प्रगती मिळेल. 1 जुलै 2023 पर्यंत मंगळ कोणत्या राशीवर कृपा करेल हे जाणून घेऊया.
1. मेष-
मंगळ संक्रमण मेष राशीच्या लोकांना लाभ देईल. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. या लोकांना कामात प्रगती (Success) मिळेल. जमीन-मालमत्तेशी संबंधित कोणत्याही प्रकरणात अडकले असाल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि राग आणि अहंकार टाळा.
2. कर्क-
मंगळाची राशी कर्क राशीच्या लोकांना अनपेक्षित परिणाम देईल. सरकारी निविदा काढण्यात किंवा नवीन करार निश्चित करण्यात यश मिळेल. धनलाभ होईल. ही कामे भविष्यात फायदेशीर ठरतील. आरोग्य आणि अपघात याबाबत काळजी घ्या. जोडीदाराशी चांगले वागा.
3. कन्या-
मंगळाचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देईल. परीक्षा-मुलाखतीत यश मिळेल. तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या, तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. कामे वेळेत पूर्ण होतील. नवविवाहितांना मुलांशी संबंधित सुखद माहिती मिळू शकेल.
4. तुळ-
तुळ राशीच्या लोकांसाठी १ जुलैपर्यंतचा काळ करिअरमध्ये फायदेशीर ठरेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे पद आणि जबाबदाऱ्या वाढतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन संधी मिळतील. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रश्न सुटतील. नवीन वाहन खरेदी करू शकता.
5. मीन -
मंगळ शुभ परिणाम देईल. मीन राशीच्या लोकांच्या उत्पन्नाचे साधन वाढेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी-व्यवसायासाठी काळ चांगला राहील. काही गोष्टी गुप्तपणे ठेवल्यातर अधिक यशस्वी व्हाल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.